Ruturaj Gaikwad Wife Utkarsha Pawar Took Dhoni’s Blessing After IPL 2023 Final Video Goes Viral; ऋतुराजच्या बायकोने लग्नापूर्वीच घेतलेला धोनी भावोजींचा आशीर्वाद

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: आयपीएल २०२३चे जेतेपद चेन्नई सुपर किंग्जने पटकावले. या विजयानंतर चेन्नईचा संघ आणि संघातील खेळाडू चर्चेत राहिले आहेत. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम एस धोनीचे अनेक व्हिडीओ सर्वांनाच भुरळ घालणारे आहेत. आता त्यातील अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नुकतेच लग्नबंधनात अडकलेले ऋतुराज गायकवाड आणि त्याची क्रिकेटपटू पत्नी उत्कर्षा पवार दिसत आहेत .तर उत्कर्षा या व्हिडीओमध्ये धोनीच्या खाली वाकून पाया पडताना दिसत आहे.चेन्नईने फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला. त्याचवेळी, सामना संपल्यानंतर सीएसकेचे सर्व खेळाडू धोनीला भेटताना आणि त्यांच्याशी बोलताना दिसले. दरम्यान, सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या पत्नीनेही थालाची भेट घेतली. भेटताच तिने धोनीच्या पायाला स्पर्श केला.

तो व्हिडीओ

सध्या भारतात एमएस धोनी असे नाव आहे की प्रत्येकजण त्याचा खूप आदर करतो. त्यामुळे आयपीएल २०२३ चा अंतिम सामना संपला तेव्हा सीएसकेचे सर्व खेळाडू एकमेकांसोबत मैदानात उभे होते. या अंतिम सामन्यासाठी ऋतुराज गायकवाडची नुकतीच झालेली बायको उत्कर्षा पवारही हजार होती. तिने सुद्धा मैदानावर आल्यावर धोनीची भेट घेतली. धोनीने प्रथम उत्कर्षाला मिठी मारली. त्यानंतर उत्कर्षाने एमएसच्या पायाला स्पर्श केला आणि त्याचा आशीर्वाद घेतला. या संपूर्ण क्षणाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ऋतुराज आणि उत्कर्षा ३ जूनला विवाहबंधनात अडकले

ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचे ३ जून रोजी महाबळेश्वर येथे लग्न झाले. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. उत्कर्षा देखील एक क्रिकेटर आहे. ती महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. दोघांनीही आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी भारताच्या राखीव संघात ऋतुराजचा समावेश करण्यात आला होता. मात्र लग्न असल्यामुळे त्याने नाव मागे घेतले होते. गायकवाड यांच्या लग्नाला त्याचे चेन्नईच्या संघातील सहकारी खेळाडू शिवम दुबे आणि प्रशांत सोलंकी यांनीही हजेरी लावली होती.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts