Tech News Technology News Apple Mobile Campany Update Iphone Namedrop Users Beware Police Issue New Warning Do Not Use This Feature( प्रगत भारत । pragatbharat.com)

iOS 17 NameDrop feature : अॅपलने नुकतेच iOS 17 अपडेट सादर केले असून त्यात ‘नेमड्रॉप’ नावाचे नवे फिचर होते. आयफोन युजर्ससोबत स्ट्रीमिंग कॉन्टॅक्ट्स शेअर करणे हा त्याचा उद्देश होता. पेनसिल्व्हेनियाच्या सिटी ऑफ चेस्ट पोलिस विभागाने अलर्ट जारी केला आहे. यामध्ये एअरड्रॉपचा धोका सांगण्यात आला आहे. 

NameDrop फीचरचा गैरवापर अनोळखी व्यक्तीही करू शकते, असा दावा पोलिसांनी केला आहे. कारण ठराविक मर्यादेत आल्यानंतर फोनची माहिती शेअर केली जाते. विशेषत: जेव्हा नेमड्रॉप एखाद्या अनोळखी व्यक्तीने अॅक्टिव्हेट केला असेल, तेव्हा आपली माहिती किंवा डेटा शेअर होण्याची दाट शक्यता आहे. 

हे अगदी सुरक्षितपणे कार्य करते. यामुळे कॉन्टॅक्ट शेअरिंगची शक्यताही कमी होते. याशिवाय युजरची संमती घेणंही गरजेचं आहे, त्यानंतरच युजरची माहिती शेअर केली जाते. दोन्ही फोन अनलॉक होईपर्यंत हे फीचर काम करत नाही. म्हणजेच युजर्सच्या परवानगी शिवाय कोणीही कोणतीही माहिती शेअऱ करु शकत नाही तरीही खबरदारी म्हणून पोलिसांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 

कॉन्टॅक्ट इंफोर्मेशन शेअऱ करण्यासाठी आपल्याला वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला फक्त दोन फोन जवळ आणावे लागतील. मात्र, या फीचरमध्ये असा कोणताही धोका नाही. युजर्स हे फीचर सहज डिसेबल करू शकतात. हे फीचर प्रत्येक आयओएस व्हर्जनमध्ये उपलब्ध नसते. यासाठी आयफोनमध्ये  IOS 17  व्हर्जन असणे आवश्यक आहे.

नेमड्रॉप फीचर कसे बंद करावे?

जर तुम्हालाही फोन येताच तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करायचा नसेल तर त्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील. त्याबद्दल टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया..

-नेमड्रॉप फीचर बंद करण्यासाठी सर्वप्रथम आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जा.
-सेटिंग्जमध्ये स्क्रॉल करून genral setting या पर्यायावर जा
-इथे थोडं स्क्रॉल केल्यावर तुम्हाला एअरड्रॉप दिसेल, त्यावर टॅप करा.
-एअरड्रॉप ऑप्शनमध्ये तुम्हाला ब्रिंगिंग डिवाइस टुगेदर पर्याय दिसेल.
-हा टॉगल डिफॉल्टपद्धतीने चालू होईल, आपल्याला फक्त तो बंद करावा लागेल.
-असे केल्याने तुमचे नेमड्रॉप फीचर बंद होईल.
-तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ही सेटिंग पुन्हा चालू करू शकता.

हे फिचर फक्त एकाच व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. सगळं साधं आणि सोपं करणारं जरी हे फिचर असेल तरीही आपण काळजी घेण्याची आणि डेटासंदर्भात योग्य सेटींग्ज करुन घेण्याची गरज आहे. 

इतर महत्वाची बातमी-

How To Clean Laptop Keyboard : एका टॉयलेट सीटवर जेवढे जंतू असतील, तेवढेच तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रिनवर असतात; लगेच स्वच्छ करा, नाहीतर…

Related posts