Pune Riskshaw Driver Make Whatsapp Video And Post It On Whatsapp Group Commmits To Suicide Pune Crime News( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यात रिक्षाचालकाने (Rikshaw driver)  मालकाच्या त्रासाला (Pune Crime news) कंटाळून आत्महत्या (suicide) केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांने एक व्हिडीओ शुट करुन Whatsapp ग्रुपवर शेअरदेखील केला. या घटनेमुळे संपूर्ण रिक्षाचालकांडून हळहळ व्यक्त केली जात आहे. या रिक्षाचालकाने राहत्या घराच्या पाचव्या मजलावरून उडी मारत  जीवन संपवलं आहे. पुण्यातील कोंढवा भागातून ही घटना समोर आली आहे. तोहिद शेख असे या तरुण रिक्षाचलकाचं नाव होतं. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तोहिद शेख हा एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत होता. अरबाज वली मोहम्मद मेमन असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. शेख हा चार वर्षांपासून त्यांच्याकडे काम करत होता. काल मेमन आणि शेख याचा वाद झाला होता. त्यानंतर मेनन यांनी शेख याला सासऱ्यांसमोर शिवीगाळ केली. याचा राग आल्याने शेख याने व्हिडीओ तयार करुन 6 व्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. 

व्हिडीओ whatsapp गृपवर टाकला अन् उडी घेतली…

आज सकाळी साडे आठच्या दरम्यान त्याने आपण आत्महत्या करत असल्याचा आणि आपबिती सांगणारा व्हिडिओ  “बघतोय रिक्षावाला कोंढवा” गृपवर टाकला आणि बिल्डिंग वरून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर या ग्रुपवरील लोकांनी त्वरित त्याला कॉल करायला सुरवात केली. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता.

व्हिडीओत काय आहे?

या व्हिडीओत शेख हा त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगत आहे. काम करताना मेनन काहीही बोलायचा मानसिक छळ करायचा. शेखच नाही तर बाकी सर्व कर्मचाऱ्यांनादेखील मेनन खालची वागणूक देत होता. त्यानंतर शेख आणि मेनन यांचा वाद झाल्यानंतर शेखला मारुन टाकण्याची धमकी देत होता. माझी कोणीती तक्रार दाखल करुन घेणार नाही, असं म्हणत मेनन अनेकांना धमकवायचा, असे अनेक आरोप शेख याने व्हिडीओत केले आहेत. पाचशे रुपयांसाठी मेनन याचे टॉर्चर केल्याचंही व्हिडीओत शेख याने सांगितलं आहे. 

हा प्रकार सावकारीचा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यावर अजूनही शिक्कामोर्तब झाला नाही. पैशाचा आणि बांधकाम व्यावसायिकांच्या जाचाला कंटाळून आतापर्यंत अनेकांनी आपलं जीवन संपवलं आहे.  त्यातच आता पुण्यात या रिक्षाचालवणाऱ्या शेख याची भर पडली आहे. त्याच्या पश्चात आता त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा वाट बघतोय रिक्षावाला संघटनेकडून करण्यात येत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

MLA Disqualification Case : जेठमलानींचे वार, सुनील प्रभूंचे पलटवार! ठाकरे कुटुंब सोडून कुणालाही शिवसेनाप्रमुख होता येतं का? जेठमलानींच्या प्रश्नावर प्रभू म्हणाले, 

Related posts