CM Eknath Shinde Visit Kokan And Rajkot Fort In Sindhudurg Maharashtra News Abp Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


CM Eknath Shinde : मुख्यमंत्री सिंधुदुर्ग येथे दाखल,  राजकोट किल्ल्याची शिंदेंकडून पाहणी ABP Majha
Ratnagiri News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या कोकणाच्या (Kokan) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना काही आदेश दिले आहेत. जर मुख्यमंत्री कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटू शकतात, तर जिल्हाधिकारी देखील कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटूच शकतात, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तसेच अत्यावश्यक कामांसाठी आलेल्या लोकांना कोणत्याही अपॉईंटमेंटशिवाय भेटण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत.  सरकारने ठरवल्याप्रमाणे अनेक प्रकल्प पूर्ण केलेत – मुख्यमंत्री शिंदे  कोकणात सरकारने ठरवल्याप्रमाणे सगळी कामं केली आहेत. कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो. मी आजपर्यंत भरपूर कागदांवर सह्या केल्यात. गुवाहाटीवरुन फोन करुन मी अनेक कामं केली आहेत, कारण सगळे प्रकल्प व्हायला हवेत ही एकच इच्छा होती, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

[ad_2]

Related posts