Team India Squad Highlights Against South Africa Ruturaj Gaikwad Shreyas Iyer And Mukesh Kumar Are The Only Players To Be Part Of T20 One Day And Test Formats Abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Team India Squad Highlights Against South Africa :  दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची तिन्ही फॉरमॅटमध्ये घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगळा कर्णधार संघाचे नेतृत्व करणार आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये, केएल राहुल वनडेमध्ये आणि रोहित शर्मा कसोटीत कर्णधार असेल. रोहित शर्माकडे टी-20 संघाचे नेतृत्वही सोपवले जाईल, असे मानले जात होते. मात्र, रोहितने T-20 आणि ODI या दोन्ही संघांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. विराट कोहलीही या दोन्ही मालिकेत खेळणार नाही.

10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात टीम इंडियाला 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. 6 डिसेंबरला संघ या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहलीला या दौऱ्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याने स्वतः या दोन मालिकांमधून ब्रेक मागितला होता.

टीम इंडियाला नवा हिटमॅन, मोहम्मद शमी अन् युवराज मिळाला

निवड समितीने तिन्ही प्रकारच्या मालिकेसाठी 31 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. यातील 17 सदस्यीय संघ T-20 साठी आणि 16-16 एकदिवसीय-कसोटीसाठी जाहीर करण्यात आले आहेत. तिन्ही संघात फक्त 3 खेळाडू आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि मुकेश कुमार यांना स्थान मिळाले आहे. ऋतुराज गायकवाड, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार, जे तिन्ही फॉरमॅटमध्ये आहेत. त्यांना T-20, वनडे आणि कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

ऋतुराज गायकवाडने टीम इंडियाचे नेतृत्व करताना राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले होते. वर्ल्डकपला त्याला संधी मिळाली नव्हती. मायदेशात सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने चमकदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये त्याने पहिल्या 21 चेंडूत 21 धावा केल्यानंतर नंतरच्या 36 चेंडूत 102 धावांचा पाऊस पाडला होता. यशस्वी जैस्वालही दमदार कामगिरी करत आहे. मात्र, ऋतुराजने बाजी मारली आहे. मुकेश कुमारनेही आपल्या गोलंदाजीतून प्रतिभा दाखवली आहे. आर. अश्विनने अलीकडेच त्याची कामगिरी पाहून भारताला नवा मोहम्मद शमी मिळाल्याची प्रतिक्रिया दिली होती. श्रेयस अय्यरने वर्ल्डकपमध्येच टीकेतून सावरत चौथ्या क्रमांकावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे मधल्या फळीत ‘युवराज’ मिळाला आहे.

12 खेळाडू दोन फॉरमॅटमध्ये 

यशस्वी जैस्वाल (T20 आणि कसोटी), शुभमन गिल (T20 आणि कसोटी), तिलक वर्मा (T20 आणि वनडे), रिंकू सिंग (T20 आणि वनडे), इशान किशन (T20 आणि टेस्ट), रवींद्र जडेजा (T20 आणि टेस्ट), वॉशिंग्टन सुंदर (T20 आणि वनडे), कुलदीप यादव (T20 आणि वनडे ), अर्शदीप सिंग (T20 आणि वनडे), मोहम्मद सिराज (T20 आणि टेस्ट), दीपक चहर (T20 आणि ODI), KL राहुल (वनडे आणि टेस्ट).

16 खेळाडू फक्त एकाच फॉरमॅटमध्ये 

रोहित शर्मा (कसोटी), विराट कोहली (कसोटी), रविचंद्रन अश्विन (कसोटी), शार्दुल ठाकूर (कसोटी), मोहम्मद शमी (कसोटी), जसप्रीत बुमराह (कसोटी), प्रसिद्ध कृष्णा (कसोटी), सूर्यकुमार यादव (टी20), जितेश शर्मा. (T20), रवी बिश्नोई (T20), आवेश खान (वनडे), युझवेंद्र चहल (वनडे), साई सुदर्शन (वनडे), रजत पाटीदार (वनडे), संजू सॅमसन (वनडे), अक्षर पटेल (वनडे)

पुजारा-रहाणे यांना कसोटी संघात स्थान नाही

कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. पुजाराने आफ्रिकन खेळपट्ट्यांवर 10 कसोटीत 535 धावा केल्या आहेत. तर अजिंक्य रहाणेने 6 कसोटी सामन्यात 402 धावा केल्या आहेत.

साई सुदर्शन आणि रिंकू यांना प्रथमच वनडेमध्ये संधी 

युवा साई सुदर्शन आणि रिंकू सिंह यांना प्रथमच वनडे संघात संधी मिळाली आहे. रिंकूने टी-20 संघासाठी पदार्पण केले आहे. साईने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.

सूर्यकुमारला वनडे संघातून वगळले 

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असलेल्या सूर्यकुमार यादवला वनडे संघातून वगळण्यात आले आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.

सॅमसन वनडे संघात परतला

T-20 मध्ये संजू सॅमसनचे वनडे संघात पुनरागमन झालेले नाही, तर T-20 आणि कसोटी संघात त्याला संधी मिळालेली नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts