Case Registered Against OBC Leader Babanrao Taywade On Controversial Statement In Hingoli Meeting Maharashtra Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

Case Registered Against Babanrao Taywade: ओबीसी नेते बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आगे. हिंगोली (Hingoli) शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 26 नोव्हेंबर रोजी हिंगोलीच्या रामलीला मैदानावरील वक्तव्य तायवाडे यांना भोवलं आहे. “ओबीसी विरोधात बोलणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याची ताकद ठेवा”, असं वक्तव्य तायवाडे यांनी केलं होतं. त्यांनतर मराठा समाजाच्या वतीनं तक्रार देण्यात आली होती. 

काय म्हणाले होते बबनराव तायवाडे? 

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. यासाठी हिंगोलीत (Hingoli) ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, ओबीसींच्या विरोधात बोलल्यास जरांगे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचे तायवाडे म्हणाले होते. तसेच, याच मेळाव्यात बोलताना बबनराव तायवाडे यांनी एक चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “यापुढे जर असा आमचा अपमान केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही. ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली, त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यात ठेवा. तसेच, मनोज जरांगे यांचं जाहीर धिक्कार करतो. 32 लाख नोंदी सापडल्या असं जरांगे म्हणाले. किती मुर्ख आम्हाला बनवत आहे. एकाच व्यक्तीची अनेक ठिकाणी नोंदी आहेत.” 

 

Related posts