Maharashtra News Aditi Tatkare Get The Guardian Minister Of Raigad Ajit Pawar Signal In Karjat Sabha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 रायगड :  अजित पवार (Ajit Pawar)  गटात नाराजीचा सूर अजित पवार गटात असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून  आहे.  महायुती (Mahayuti)  सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या (NCP)  मंत्र्यांना डावललं जात असल्याने नाराजीचा सूर आहे.आपल्याला जे पाहिजे ते पदरात पाडून घ्यायचा हातखंडा अजित पवारांचा असल्याचा नेहमीच पाहायला मिळतो. लवकरच पालकमंत्रीपदावरून (Guardian Minister)  असलेली नाराजी दूर होणार आहे. अजित पवारांनी स्वत: कर्जतच्या सभेत (Ajit Pawar Karjat Sabha)  कार्यकर्त्यांना संबोधित करताना या संदर्भात वक्तव्य केले आहे. लवकरच इतर पक्षांशी चर्चा करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

 पुण्याचे पालकमंत्री पद मिळाल असलं तरी अजित पवार गटामध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतय. त्याला फक्त पालकमंत्री पदांच वाटपच नाही तर अनेक निर्णयात डावलं जात असल्याची या  मंत्र्यांची भावना आहे. या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले, सध्या असलेल्या पालकमंत्र्यांशिवाय उरलेल्या मंत्र्यांनाही पालकमंत्रीपद मिळावं यासाठी चर्चा करून निर्णय घेणार आहे.  आम्ही राहिलेल्या मंत्र्याबाबत देखील पालकमंत्री पद देण्यासाठी प्रयत्नशील आहेत इतर नेत्यांसोबत लवकरच या विषयांवर बसणार आहे. 

 पालकमंत्री पदांच्या वाटपावरून नाराजी

 अजित पवार यांना पुण्याच पालकमंत्री पद देण्यात आलं. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आदिती तटकरे यांना रायगड किंवा रत्नागिरी पालकमंत्री पद मागितलं होतं. मात्र ते न देता उदय सामंत याच्याकडे दोन पालकमंत्री पद ठेवण्यात आली. छगन भुजबळ हे अजित पवार गटांमध्ये वरिष्ठ मंत्री आहेत त्यांनी नाशिकचे पालकमंत्री पद मागितलं होतं. मात्र त्यांना न देता शिंदे गटाचे दादाजी भुसेंकडे कायम ठेवण्यात आले आहे. पालकमंत्री पद देताना भाजपने त्याग करत आपल्या वाट्याला आलेली  पालकमंत्री पद दिली. मात्र शिंदे गटाने महत्वाची पालकमंत्री पद आपल्याकडे कायम ठेवली आहे.

राष्ट्रवादीप्रमाणे भाजप नाराज

अजित पवार गटामध्ये नाराजी आहे. तशीच काही प्रमाणात नाराजी ही भाजपच्या मंत्र्यांमध्ये पाहायला मिळते. कारण राष्ट्रवादीसाठी सर्वात जास्त त्याग भाजप करताना पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाच्या पालकमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांना त्याग करावा लागला. या उलट मात्र शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम राहताना पाहायला मिळत आहे. हीच भाजपची नाराजी मोहित कंबोज यांच्या ट्विट आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाषणातून पाहायला मिळाली. आता आगामी काळात ही नाराजी अजित पवार राष्ट्रवादी गट आणि भाजप कशा प्रकारे दूर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

[ad_2]

Related posts