Why Team India Is Practicing With Green Yellow Rubber Ball For WTC 2023; WTC Final ड्यूक्स बॉलने खेळणार, पण टीम इंडिया करतेय रंगीबेरंगी चेंडूंनी सराव

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी सध्या भारतीय संघ कसून तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाचा संपूर्ण संघ जोमाने तयारी करतानाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. पण आता असा एक प्रश्न पडला आहे की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा ड्यूक बॉलने खेळला जाणार आहे, ड्यूक बॉल हा इंग्लंडमध्ये खेळताना वापरला जातो. मग जर सामना ड्यूक बॉलने खेळला जाणार आहे तर सरावही त्यानेच करायला हवा पण टीम इंडिया मात्र सरावासाठी वेगळेच चेंडू वापरत आहे, पाहूया काय आहे यामागील कारण….टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान रंगीत रबर बॉलचा वापर करण्यात येत आहे. तेही लाल किंवा गुलाबी रंगाचे नाही, ज्याद्वारे कसोटी सामने आयोजित केले जातात. त्याऐवजी हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे रबरी चेंडू वापरण्यात आले. आता हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण नंतर कळले की त्या हिरव्या-पिवळ्या चेंडूंच्या वापरामागे एक कारण आहे. वास्तविक, टीम इंडिया त्या चेंडूंचा वापर स्लिप कॅचिंगच्या सरावासाठी करताना दिसली.

सराव सत्रादरम्यान शुभमन गिल हिरव्या चेंडूवर झेल घेताना दिसला. याशिवाय एक पिवळा रबर बॉलही होता. एनसीएशी संबंधित क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या मते, हे आम्ही रस्त्यावर क्रिकेट खेळताना वापरत असलेल्या रबरी चेंडूंपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. टीम इंडियाच्या सराव सत्रात वापरल्या जाणार्‍या रंगीत रबर बॉलला ‘रिअ‍ॅक्शन बॉल्स’ म्हणतात, जे क्षेत्ररक्षणाच्या सरावासाठी वापरले जातात.
टीम इंडिया हिरव्या-पिवळ्या चेंडूने सराव का करत आहे?

ज्या देशांमध्ये चेंडू स्विंग होतो. बॅटची धार घेतल्यानंतर मूव्ह होणाऱ्या देशांमध्ये स्लिप कॅचिंगचा सराव करण्यासाठी रिअ‍ॅक्शन बॉलचा वापर केला जातो. ड्यूक्स बॉल देखील स्विंग घेतो आणि दिशा बदलतो. म्हणूनच हिरव्या-पिवळ्या रबर बॉल्सचा सराव केला जात आहे कारण ते अधिक स्विंग घेतात आणि मूव्ह होतात.

आरसीबीसारखे संघ एका विजयासाठी गुडघे टेकतात तिथे १० फायनल आणि ५ ट्रॉफी जिंकतो त्याला धोनी म्हणतात !

रिअ‍ॅक्शन बॉलची खासियत

स्लिप कॅचिंगच्या सरावासाठी वापरलेले रिअ‍ॅक्शन बॉल हवेत जास्त मूव्ह होतात आणि त्यांची दिशा बदलतात कारण ते वजनाने हलके असतात. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला मग झेल घेण्यासाठी त्यानुसार स्वतःला त्यापद्धतीने सेट करावे लागते. बॉलच्या वेगवेगळ्या रंगांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची रेषा कळण्यास मदत होते.

[ad_2]

Related posts