Sharad Pawar Vs Ajit Pawar NCP Chief Answers To DCM Ajit Pawar On His Remark On Baramati Lok Sabha Election Supriya Sule Eknath Shinde Devendra Fadnavis BJP

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही गौप्यस्फोट केलेत त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच कळल्या, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.  शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेले गौप्यस्फोट, राज्यातील पाणी टंचाई आणि अतिवृष्टी याबाबत भाष्य केलं.उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिलं. अजित पवारांनी लोकसभेच्या (Lok Sabha Election) चार जागा लढवण्याची घोषणा केली. त्यावरही शरद पवारांनी भाष्य केलं. ते पुण्यात बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते. 

अजित पवारांची भूमिका आमच्याशी सुसंगत नव्हती

पक्षाचा अध्यक्ष मीच होतो, माझी भूमिका स्पष्ट होती, भाजप बरोबर जायचं नव्हतं. भाजपसोबत जाण्याची भूमिका आमची नव्हती. अजित पवारांची भूमिका आमच्याशी सुसंगत नव्हती. मी राजीनामा देण्याचं कारण काय होतं? मी पक्षाचा अध्यक्ष होतो. माझ्या राजीनाम्याचा निर्णय सामूहिक झाला होता. भाजपसोबत जायचं नाही ही आमची भूमिका होती. ज्यांना जायचं होतं ते त्यांच्यासोबत गेले.  मी त्यांना कधीच बोलावलं नाही, असं शरद पवार म्हणाले.

 गौप्यस्फोटातील बाबी पहिल्यांदाच समजल्या 

अजित पवार यांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार म्हणाले, “त्यातील बऱ्याच गोष्टी मला पहिल्यांदाच समजल्या. ज्या मागण्या केल्या होत्या त्या संबंधीची चर्चा झाली होती. मात्र तो रस्ता आम्हाला मान्य नव्हता. आम्ही भाजपमध्ये जाण्यासाठी लोकांची मतं मागितली नव्हती. जी आमची भूमिका होती त्याला लोकांचा पाठिंबा होता. त्यांनी निवडलेला रस्ता म्हणजे लोकांची फसवणूक आहे”. 

आव्हाड, परांजपेंच्या मदतीची गरज नाही 

पक्षाचा अध्यक्ष मी होतो. सामूहिक निर्णय झाला होता. भाजपबरोबर जायला नको ही स्पष्ट भूमिका होती. मला आनंद परांजपे किंवा जितेंद्र आव्हाडांची मदत घेण्याची गरज नाही.  माझी स्वत:ची निर्णय घेण्याची कुवत आहे. लोकांच्या समोर जायचं असेल तर लोक जी भूमिका घेतील ती मान्य करावी लागेल. काहीही स्टेटमेंट केलं त्याचा स्वीकार मी का करायचा? त्यांनी राजकीय निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे, फक्त त्यांनी राष्ट्रवादीच्या नावावर मत मागितलं.  त्याच्याशी विसंगत भूमिका त्यांनी घेतली आहे.

प्रफुल पटेलांनी ईडीच्या कारवाईवर पुस्तक लिहावं 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी आपण लवकरच पुस्तक लिहून गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर शरद पवार म्हणाले, पटेलांच्या पुस्तकाची मी वाट बघतोय. प्रफुल पटेलांकडे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. पटेलांनी लोक पक्ष सोडून का जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं.ईडीच्या कारवाईवरही त्यांनी पुस्तक लिहावं.

अनिल देशमुख काय म्हणाले? 

ज्यांनी मला फसवलं (भाजप) त्यांच्यासोबत मला जायचं नव्हतं. आमच्यासोबत चला म्हणून माझ्या घरी हसन मुश्रीफ पाच तास बसून होते. मला पाहिजे ते मंत्रीपद द्यायला सुद्धा तयार होते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला. 

राज्यातील परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगणार

राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये दौरे झाले. त्यांच्या पाहण्यांमध्ये दोन गोष्टी दिसल्या. दुष्काळी परिस्थिती आहे, पाणी टंचाई आहे. काही भागात अतिवृष्टी झाली आहे.मोठं नुकसान झाले. येत्या अधिवेशनात ही भूमिका मांडली जाईल. त्याआधी मुख्यमंत्री यांनी वेळ दिला तर आम्ही जाऊन भेटणार. हे सगळे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहोत 

अजित पवार काय म्हणाले होते?

सरकारसोबत जा, मी राजीनामा देतो असं शरद पवार (Sharad Pawar)  म्हणाल्याचा  गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी  (Ajit Pawar) केला होता.शरद पवार यांनीच सत्तेत सहभागी व्हावं असं सांगितलं होतं. शरद पवार यांची सातत्याने धरसोडवृत्ती सुरू होती, त्यामुळेच आम्हाला निर्णय घ्यावा लागला असं अजित पवार म्हणाले होते. 

Sharad Pawar press conference LIVE : शरद पवार यांची पत्रकार परिषद 

[ad_2]

Related posts