Mumbai Traffic Police Reply To NCP MP Dr Amol Kolhe Tweet On Mumbai Traffic Police Action For Violation Traffic Rules

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी मुंबईत वाहतूक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) सुरू असलेल्या दंडात्मक कारवाईबाबत ट्वीट केले. हे ट्वीट करताना खासदार कोल्हे यांनी ‘ट्रिपल इंजिन सरकार, ट्रिपल वसुली’ असं म्हणत वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत  राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीट करत उत्तर दिले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरू असून संभ्रम निर्माण करण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितीची माहिती घ्यावी असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

मुंबईतील वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईवर ट्वीट करत खासदार कोल्हे यांनी म्हटले की, “आजचा धक्कादायक अनुभव!… मुंबईत सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेतली. त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात 25000 रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे आदेश असल्याचे सांगितले असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. त्यांच्या या ट्वीटला  मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीट केले. 

 

मुंबई वाहतूक पोलिसांनी काय म्हटले?

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ट्वीला मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीट करून आपली बाजू स्पष्ट केली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या ट्वीटनुसार, मुंबई शहरात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेल्या 1.31 कोटींपेक्षा अधिक ई-चलानधील 685 कोटी रूपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम 1 जानेवारी 2019 पासुन प्रलंबित आहे. ही दंडनीय रक्कम शासनजमा करण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियंमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमध्ये वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी शनिवार आणि रविवार या दिवशी दंड वसुलीची मोहिम हाती घेण्यात येते.

 

अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारा संदेश समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यापुर्वी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने पर्यवेक्षिय अधिकाऱ्यांकडुन वस्तुस्थितीची माहिती घेऊन आपण संदेश प्रसारित करणे अपेक्षित होते, असे ट्वीट मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

खासदार कोल्हे यांनी काय म्हटले होते?

खासदार कोल्हे यांनी म्हटले आहे की, “आजचा धक्कादायक अनुभव!… मुंबईत सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेतली. त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात 25000 रूपयांची वसुली व 20 वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असे आदेश असल्याचे सांगितले. तो मेसेज पाहून मला धक्काच बसला. मुंबईत 652 ट्रॅफिक जंक्शन आहेत. 25,000×652 = 1,63,00,000 प्रति दिन म्हणजे, फक्त एकट्या मुंबईत तब्बल 1.63 कोटी रुपये जमा होतात. इतर शहरांचं काय?… त्यामुळे संबंधित मंत्रीमहोदयांनी आणि अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास, वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का? याची जनतेला माहिती मिळेल. शेवटी ट्रिपल इंजिन, ट्रिपल वसुली” असा टोलाही कोल्हे यांनी लगावला. 



[ad_2]

Related posts