Vinod Tawde Reaction On Five States Assembly Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Vinod Tawde on Election : निवडणुकांमध्ये यश, भाजपनं कशी आखली होती रणनीती, विनोद तावडे Exclusive

मुंबई: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकांमध्ये (Assembly Election Result) काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय. मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अपेक्षा असतानाही त्यांना जनतेने नाकारलं आहे. त्यामुळे 1980 नंतर पहिल्यांदाच उत्तर भारतातील हिंदी बेल्टमध्ये काँग्रेसची (Congress In Hindi Belt) सत्ता नसेल. त्यामुळे हिंदी बेल्टमधून काँग्रेस ‘आऊट’ झाल्याचं स्पष्ट झालंय.  

मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election Result) आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या पराभवाची सर्वाधिक चर्चा होत आहे. पक्षाच्या अंतर्गत अहवालात या राज्यांमध्ये विजयाचा दावा करण्यात आला होता. खुद्द राहुल गांधींनी मध्य प्रदेशात 135 जागा मिळण्याचा दावा केला होता. त्याचवेळी अनेक सर्वेक्षणांमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसची मजबूत स्थिती दिसून येत होती.

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परंपरेनुसार पक्ष पराभवाचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी करणार आहे. मात्र निवडणुकीतील पराभवाच्या आढाव्याचा मुद्दा काँग्रेससाठी नवीन नाही. राहुल गांधी यांनी गेल्या 9 वर्षात 12 पराभवानंतर आढावा घेतला होता. यावेळीही पराभवाला प्रादेशिक नेत्यांपेक्षा काँग्रेस हायकमांडच अधिक जबाबदार असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. 

[ad_2]

Related posts