DCM Devendra Fadanvis Reaction On 4 States Election Result Said Credit For This Victory Goes To PM Modi Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : चार राज्यांतील निवडणुकांच्या (Assembly Election Result) निकालांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली. या विजयाचं श्रेय हे पंतप्रधान मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) आणि जे.पी नड्डा (J.P. Nadda) यांचं आहे. मोदींवरील विश्वासाचं हे यश असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. हा अभूतपूर्व निकाल असून जनतेच्या मनात काय आहे याची ही नांदी असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. दरम्यान आता महाराष्ट्रात देखील भाजपचं (BJP) सरकार येणार असल्याचा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला. 

राष्ट्रीय अध्यक्ष आणि  त्या त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची राष्ट्रीय टीम आहे या सगळ्यांचं हे श्रेय आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाची मतं  दहा टक्केपेक्षा देखील जास्त वाढलेली आहे आणि विशेषतः छत्तीसगड राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात ही टक्केवारी आहे.  मध्य प्रदेशमध्ये आठ टक्क्यानी ती मतं वाढली असल्याची माहिती यावेळी देवेंद्र फडवीसांनी दिली. 

इंडिया आघाडीला लोकांनी नाकारलं – देवेंद्र फडणवीस 

इंडिया आघाडीला जनतेने आता नाकारलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अजेंडाला देखील लोकांनी नाकारलं आहे. आपल्या एक गोष्ट स्पष्ट झाली आहे जी इंडिया तयार झाली होती त्या इंडिया आघाडीला लोकांनी नाकारलेला आहे. याची मला पूर्ण खात्री आहे तर त्यांनी कोणावरही खापर फोडलं तरी देखील जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे मला हे देखील नमूद केलं पाहिजे.  हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं दोन तृतीयांश ग्रामपंचायत आणि लोकसभेमध्ये देखील तेच आपल्याला पाहायला मिळालं, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. 

हे अभूतपूर्व यश – फडणवीस 

तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व अशा प्रकारचे यश प्राप्त झालं आहे. हे यश जनतेचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरचा विश्वास आहे.  मोदीजींनी पारदर्शीपणे प्रामाणिकपणे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला, ज्या प्रकारे मोदीजींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेलं, ज्या प्रकारे मोदीजींनी सामान्य माणसाच्या मनामध्ये हे बिंबवलं आहे की सरकार त्यांच्या करता काम करत आहे आणि त्याचं प्रत्यंतर ज्या प्रकारे लोकांना त्या ठिकाणी पाहायला मिळालं, हा त्याचा खर म्हणजे विजय आहे.  म्हणून या सर्व राज्यांमधल्या जनतेचे तर आभार मानतोच पण खऱ्या अर्थाने या विजयाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे, मोदीजींच्या नावाचं, त्यांच्या करिष्म्याचं आहे. त्यासोबत आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि आमचे मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमित शाह यांच्यासोबत त्या त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची राष्ट्रीय टीम आहे या सगळ्यांचं हे श्रेय आहे. म्हणून या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो.

खरं म्हणजे आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाची मतं ही दहा टक्के पेक्षा देखील जास्त वाढलेली आहेत. विशेषता छत्तीसगडमध्ये जवळपास 14 टक्के मतं वाढली. राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली, मध्य प्रदेश मध्ये आठ टक्क्याने मतं वाढली. तेलंगाना मध्ये देखील जवळपास दहा टक्क्यांनी मत वाढलेली आहेत. त्यामुळे एकूणच सगळीकडे मोठ्या प्रमाणात जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.

आपण जर आताचे कल बघितले तर साधारणपणे 639 पैकी 339 जागा भारतीय जनता पार्टी जिंकतेय. म्हणजे 50 टक्के पेक्षा जास्त जागा या चारही राज्यांमध्ये मिळून या भारतीय जनता पक्षाला मिळतात. हा निकाल एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये काय आहे, याची नांदी आहे.

 लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे आणि NDA ला मिळणार आहे त्याचीही नांदी आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे जी I.N.D.I.A. आघाडी तयार झाली होती त्या इंडिया आघाडीला लोकांनी नाकारलेला आहे राहुल गांधींनी जो अजेंडा चालवला होता त्या अजेंड्यालाही लोकांनी नाकारला. लोकांच्या मनामध्ये केवळ मोदीजी आहेत. 

आता मला पूर्ण कल्पना आहे की याच्यानंतर इंडिया आघाडीची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या पराभवाचे खापर हे ईव्हीएम वर फोडले जाईल याची मला पूर्ण खात्री आहे. पण त्यांनी कोणावरही खापर फोडलं तरी देखील जनता ही मोदीजींच्या पाठीशी आहे. मला हे देखील नमूद केलं पाहिजे हीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील आहे, महाराष्ट्रामध्ये नुकत्याच ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं दोन तृतीअंश ग्रामपंचायती आमच्या महायुतीने जिंकल्या. आणि लोकसभेमध्येही तेच आपल्याला पाहायला मिळेल. जो विकास आणि विश्वास मोदीजींनी तयार केला आहे, डबल इंजिन सरकारने तयार केला आहे, त्याच्या आधारावर मला विश्वास आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि देशात भारतीय जनताच पाहायला मिळेल.

 

हेही वाचा : 

घर घर मोदी म्हटलं जायचं पण आता ‘मन मन मोदी’ असा निकाल; मोदी लोकप्रियतेत पहिल्या नंबरवर : मुख्यमंत्री

 

[ad_2]

Related posts