मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणखी एका सदस्याने दिला राजीनामा( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : राज्य मागासवर्ग आयोगात राजीनामा सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.  कारण आज पुन्हा सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चार दिवसात हा दुसरा राजीनामा आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य असलेले लक्ष्मण हाके यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी बबनराव तायवाडे, संजय सोनवणे, बी. एल. किल्लारीकर आणि आता लक्ष्मण हाके यांनी मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आयोगाच्या बैठकीत माझ्या आणि आयोगाच्या वैचारिक मतभेदांमुळे व्यथित होऊन आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकीकडे राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय होत असतानाच दुसरीकडे मात्र आयोगाच्या सदस्यांचे राजीनामा सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Related posts