Telangana Assembly Election Final Result Huge Set Back To K Chandrashekar Rao And His Brs Party Who Tried To Grand Political Entry In Maharashtra Mva Bjp Abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Telangana Election KCR : देशव्यापी नेतृत्वाचे स्वप्न तसेच पक्षाचे नाव तेलंगणा व्हाया महाराष्ट ते भारत अशी राजकीय वाटचाल सुरु केलेल्या के. चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांना तेलंगणात मतदारांनी जमिनीवर आणलं आहे. तेलंगणात हॅट्ट्रिकच्या तयारीत असलेल्या केसीआर यांना (Telangana Assembly Election Results 2023) काँग्रेसने रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांच्या नेतृत्वात तगडा झटका देत सत्ता आणली आहे. कर्नाटकात विजय मिळवल्यानंतर काँग्रेसने सर्वाधिक लक्ष तेलंगणात केले होते. मात्र, देशव्यापी नेतृत्वाची स्वप्ने पडलेल्या केसीआर यांना त्यांची जाणीव नव्हती. इतकंच नव्हे, तर गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी सर्वाधिक शक्ती खर्च केली. तब्बल 700 गाड्यांचा ताफा घेऊन पंढरपूरला येत केसीआर यांनी महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरु केली होती. मात्र, आता तेलंगणात पराभव झाल्याने विशेष करून महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे असे म्हटल्यास राजकीय अतिशयोक्ती ठरणार नाही. 

केसीआरना भाजपचं बळ असल्याचा राजकीय आरोप (K Chandrashekar Rao)

केसीआर यांनी तेलंगणानंतर सर्वाधिक लक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) केंद्रित केले होते. दैनिकांसह त्यांनी टीव्हींना जाहिराती देत राज्यात दौऱ्यावर दौरे केले होते. त्यामुळे केसीआर यांचा झगमटामागे कोणती राजकीय अदृश्य शक्ती काम करत आहे याचीच चर्चा रंगली होती. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व जागा लढवण्यासाठी त्यांनी शक्ती पणाला लावली होती. सर्व मतदारसंघात त्यांनी निरीक्षक सुद्धा नेमण्याची सुरुवात केली होती. इतकेच नव्हे, तर मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करण्यासाठी शेतकरी चळवळ हेरण्यासाठी त्यांनी रघुनाथदादा पाटील यांनाही पक्षात घेतले होते. राजू शेट्टी यांनाही गळ टाकण्याचा प्रयत्न केसीआर यांनी केला होता. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यांचा कोल्हापूर आणि सांगली दौराही झाला होता. मात्र, त्यांना अपेक्षित मायलेज मिळाले नव्हते. भगीरथ भालके यांनीही केसीआर यांच्या पक्षात प्रवेश केला होता. 

600 गाड्यांच्या ताफ्यासह सिंगम स्टाईल महाराष्ट्रात एन्ट्री  (KCR In Maharashtra) 

आषाढी एकादशीच्या तोंडावरही केसीआर यांनी सोलापुरात जंगी इव्हेंट केली होती. केसीआर यांनी 600 गाड्यांच्या ताफ्यासह, आमदार-खासदार आणि मंत्र्यांसह आज सोलापुरात दाखल झाले होते. यानंतर राज्यात त्यांच्या ग्रँड एन्ट्रीची आणि  भाजपही शांतपणे पाहत असल्याने राजकीय चर्चा रंगली होती. केसीआर यांना भाजपकडून बळ मिळत असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला होता. हे मिंधे माॅडेल असल्याचेही सामनाच्या अग्रेलखातून म्हटले होते. पैशाच्या बाबतीत केसीआर आणि शिंदे गट भाजपला टक्कर देत असल्याचाही आरोप करण्यात आला होता. 

मुलगीला ईडीची नोटीस अन् केसीआर यांनी सूर बदलला (ED questions KCR daughter Kavitha in Delhi excise policy)

केसीआर यांनी तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती नाव केले होते. तसेच मोदींविरोधात तिसरा पर्याय उभा करण्यासाठी भेटीगाठी सुरु केल्या होत्या. त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचीही भेट घेतली होती. नितिशकुमार यांचीही त्यांनी भेट घेतली होती. दिल्ली मद्य धोरण प्रकरणी ईडीकडून गेल्यावर्षी गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच प्रकरणात हैदराबादस्थित उद्योगपतीला बेड्या पडल्यानंतर केसीआर यांची कन्या के. कविता (ED questions KCR daughter Kavitha in Delhi excise policy)  यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. यानंतर त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली.

संसद आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी राखीव जागा राखण्यासाठी कायदा त्वरित मंजूर करावा या मागणीसाठी कविता यांनी राजधानीतील जंतरमंतर येथे निदर्शने करणार असल्याची घोषणा केल्याने ईडीचे समन्स आल्यानंतर लगेच त्यांना दिल्ली मद्य धोरण संदर्भात ईडीची नोटीस येऊन धडकली होती.मुलगीला नोटीस येताच केसीआर यांनी तसेच आठ विरोधी नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय विरोधकांविरुद्ध केंद्रीय एजन्सींच्या “दुरुपयोग” विरोधात संयुक्त पत्र लिहिले होते. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची या प्रकरणातील चौकशी आणि अटक तसेच हैदराबादमधील उद्योगपतीला अटक झाल्यानंतर हे पत्र आले होते. 

महाविकास आघाडीवर मतविभागणीची टांगती तलवार 

मुलगीला नोटीस आल्यानंतर केसीआर यांचा मोदीविरोधातील सूर पूर्णत: बदलून गेला. त्यांनी आपला मोर्चा पूर्णत: महाराष्ट्रावर फोकस केला होता. त्यामुळे केसीआर यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीसाठी सर्वाधिक आव्हान निर्माण झाले होते. महाविकास आघाडीला राज्यात पोषक वातावरण असल्याचे त्याच दरम्यान भाजपच्या सर्व्हेतून दिसून आल्यानंतर अजित पवारांना फोडण्यासाठी दिल्लीतील यंत्रणा सक्रिय झाली होती. याचवेळी केसीआर यांचेही दौरे वाढत चालल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली होती. 

तेलंगणात पराभव तेलही गेलं आणि तुपही गेलं 

पहिल्यांदा देशव्यापी आणि नंतर महाराष्ट्राचे स्वप्न पाहिलेल्या केसीआर यांना तेलंगणात काँग्रेसने जबर हादरा दिला. इतकंच नव्हे, तर केसीआर यांना कामारेड्डी मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले. बीआरएसला केवळ 39 जागांवर समाधान मानावे लागलं आहे. एमआयएमने सात जागा जिंकल्या आहेत. भाजपने 8 जागा जिंकत पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे तर भाजपचे के वेंकट रमणा रेड्डी यांनी कामारेड्डी विधानसभा निवडणुकीत 2023 च्या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री केसीआर आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री उमेदवार रेवंत रेड्डी या दोघांचाही पराभव केला आहे. पीएम मोदींनी विधानसभा निवडणुकीत तेलंगणावर जास्त जोर दिला होता. 

केसीआर यांचा तेलंगणात भाजप उमेदवाराकडून पराभव

तेलंगणात भाजपने एकूण आठ जागा जिंकल्या आहेत. यापैकी सहा जागांवर त्यांनी बीआरएसचा तर दोन जागांवर काँग्रेसचा पराभव केला. यामध्ये भाजपने गोशामहलची जागा राखली असली तरी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि करीम नगरचे खासदार बंदी संजय यांना पराभवाचा सामना करावा लागला. इतकेच नाही तर पक्षाच्या आणखी दोन खासदारांना, आदिलाबादचे खासदार सोयाम बापूराव आणि निजामाबादचे खासदार अरविंद धर्मपुरी यांना पराभवाला सामोरे जावे लागले, पण तेलंगणात पक्षाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीने 2024 आणि त्यानंतरही तेलंगणाच्या आशा उंचावल्या आहेत. त्यांचा दावा आणखी मजबूत करू शकतो. अशा स्थितीत आगामी काळात पक्षाचे मिशन दक्षिण केंद्रस्थानी राहिल्यास नवल वाटणार नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा पक्ष निश्चितपणे प्रयत्न करेल.

हे सुद्धा वाचा 

[ad_2]

Related posts