Iphone 15 Available At Less Than 40000 At Amazon And Flipkart Here Is How This Deal Work

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

iPhone 15 Offers : सध्या सगळीकडेच आयफोन 15 ची क्रेझ आहे. लोक लोन काढून आयफोन खरेदी करताना दिसत आहे. मात्र हाच आयफोन 15  फक्त 40,000 हजरांना खरेदी करु शकणार आहात, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. आयफोन15 ची सीरिज 79,900 रुपयांपासून सुरू होते आणि 2 लाख रुपयांपर्यंत जाते. मात्र, अॅपलच्या आयफोन 15 वर ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफर्सदेखील दिले जात आहे. त्यामुळे आता आयफोन 15 तुम्ही स्वस्तात खरेदी करु शकणार आहात. 

अॅपलच्या आयफोन 15 ची 128 जीबीची किंमत 79,900 रुपये आहे. अॅमेझॉनवर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर 5,000 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय मोबाइल फोनवर 34,500 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंटही दिला जात आहे. जर तुमचा जुना फोन पूर्णपणे नवीन स्थितीत असेल किंवा तुमच्याकडे गॅलेक्सी फोल्ड किंवा एस 23 वगैरे दुसरा प्रीमियम फोन असेल तर तुम्हाला चांगली एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते.

सर्व डिस्काउंट मिळाल्यानंतर तुम्ही आयफोन 15 फक्त 36,400 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. अॅमेझॉनवर आयफोन 15 ची किंमत सध्या 75,900 रुपये आहे. त्यासोबतच आपण Invent स्टोअरवरून आयफोन 15 देखील खरेदी करू शकता. येथे स्मार्टफोनवर 3000+5000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

आयफोन 15 च्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आणि  A 16 बायोनिक चिपचा सपोर्ट आहे. फोनमध्ये 4X रिझोल्यूशनसह नवीन 48 MP मुख्य कॅमेरा, तसेच 12 MPचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. वेगवान डेटा ट्रान्सफर स्पीडसाठी आयफोन 15 यूएसबी 3.2 Gen 5 सपोर्ट करतो. 

 

भारतात Apple 15 सीरीज किंमत

iPhone 15 (128 GB): 79,900 रुपये
iPhone 15 (256 GB): 89,900 रुपये
iPhone 15 (512GB): 1,09,900 रुपये
 
iPhone 15 Plus (128 GB): 89,900 रुपये
iPhone 15 Plus (256 GB): 99,900 रुपये
iPhone 15 Plus (512 GB): 1,19,900 रुपये
 
iPhone 15 Pro(128 GB): 1,34,900 रुपये
iPhone 15 Pro(256 GB): 1,44,900 रुपये
iPhone 15 Pro(512GB): 1,64,900 रुपये
iPhone 15 Pro (1 TB): 1,84,900 रुपये

iPhone 15 Pro Max (256 GB): ₹,59,900 रुपये
iPhone 15 Pro Max (512 GB): 1,79,900 रुपये
iPhone 15 Pro Max (1 TB): 1,99,900 रुपये 

सध्या सगळ्यांनाच आयओइस सिस्टीमवर शिफ्ट व्हायचं आहे. त्यामुळे अनेक लोक आयफोन घेण्याच्या तयारीत आहे. त्यासोबतच या फोनची क्रेझदेखील आहे. मात्र अनेकांना हा फोन परवडणाऱ्या बजेटमध्ये येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे ऑफर्स वापरुन आयफोन कमी किंमतीत खरेदी करु शकता. 

इतर महत्वाची बातमी-

iPhone 16 feature leaks : iPhone 16चे फिचर्स leaks?, iPhone 16 कसा दिसेल? कधी होणार लॉंच? डिस्प्लेपासून बॅटरी लाइफपर्यंत, संपूर्ण माहिती एका क्लिकवर…

[ad_2]

Related posts