Hardik Pandya Set To Out From Indian Cricket Team For 18 Months Bcci And Nca Curated 18 Months Master Plan World Cup 2023 IPL 2024 Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Hardik Pandya Injury Update: 2023 च्या वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) टीम इंडियानं (Team India) सुरुवातीपासूनच धुवांधार खेळी केली. पण, फायनलमध्ये परभव झाला अन् देशातील कोट्यवधी चाहत्यांची मनं तुटली. 2023 च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या चाहत्यांना आणखी एक धक्का बसला. तो म्हणजे, टीम इंडियाचा ऑलराउंडर बिनधास्त हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) भर सामन्या दरम्यान झालेली दुखापत आणि त्यानंतर त्याची वर्ल्डकपमधून झालेली एक्झिट. हार्दिकला झालेल्या दुखापतीनंतर चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेनं वाट पाहत होते. पण, अखेर बीसीसीआयनं (BCCI) हार्दिक वर्ल्डकपमध्ये खेळणार नसल्याचं जाहीर केलं आणि कोट्यवधी भारतीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला. तेव्हापासून आतापर्यंत हार्दिकनं टीम इंडियात पुनरागमन केलेलं नाही. अशातच हार्दिकला पुन्हा टीम इंडियातून खेळताना पाहण्यासाठी चाहते आतूर झालेत. आता BCCI नं यासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. 

2023 च्या विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो परत येऊ शकला नाही. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या पुढील 18 आठवडे संघाबाहेरच राहणार आहे. हार्दिकची दुखापत लवकरात लवकर बरी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) यांनी एकत्रितपणे हार्दिकसाठी 18 आठवड्यांचा मेगाप्लान केला आहे. 

2024 ते 2026 दरम्यान हार्दिक पांड्यानं सर्वोत्तम फिटनेसमध्ये राहावं, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. ‘न्यूज 18’नं दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय आणि एनसीएनं हार्दिकच्या फिटनेससाठी 18 आठवड्यांचा मेगाप्लान तयार केला आहे. या मेगाप्लाननुसार, मार्चपर्यंत हार्दिकच्या फिटनेसचं दररोज मूल्यांकन केलं जाईल.

2023 च्या विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. टीम इंडियानं विश्वचषकातील चौथा साखळी सामना बांगलादेशविरुद्ध खेळला होता. गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर हार्दिक मैदानाबाहेर गेला होता, त्यानंतर मात्र तो अद्याप टीम इंडियात परतलेला नाही.

हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमावर टी-20 संघाची धुरा 

भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मानं 2023 मध्ये कोणत्याही T20 सामन्याचं नेतृत्व केलेलं नाही. 2023 मध्ये टीम इंडियानं खेळलेल्या सर्व टी20 सामन्यांची धुरा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. पण हार्दिकच्या दुखापतीनंतर बीसीसीआयनं फॉरमॅटचा नंबर वन बॅट्समन सूर्यकुमार यादवला भारताच्या T20 आंतरराष्ट्रीय संघाचा कर्णधार बनवलं.

‘द मेन इन ब्लू’नं वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 सीरिज खेळली. ज्याद्वारे सूर्यकुमार यादवनं पहिल्यांदाज टीम इंडियाची जबाबदारी स्वीकारली आणि कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळलेल्या टी-20 मालिकेतही सूर्याच्याच खांद्यावर संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. 

[ad_2]

Related posts