( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chandra Mangal Yog: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी राशीमध्ये बदल करतो. यामध्ये चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच दिवस लागतात. चंद्र ज्यावेळी गोचर करतो तेव्हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी त्याचा संयोग होतो.
येत्या 11 डिसेंबर रोजी सकाळी 6.11 वाजता चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी मंगळ आधीच त्या राशीमध्ये उपस्थित असल्याने मंगळ आणि चंद्राच्या संयोगामुळे चंद्र मंगल योग तयार होणार आहे. हा संयोग अत्यंत शुभ मानला जातो. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अचानाक भरपूर पैसे आणि जीवनात आनंद येणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मिथुन रास (Mithun Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी चंद्र मंगल योग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. धैर्याने आणि आत्मविश्वासाने अनेक गोष्टी करू शकणार आहात. चंद्र मंगल योगामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवू शकता. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ती फायदेशीर ठरू शकते.
सिंह रास (Leo Zodiac)
या राशीच्या लोकांना चंद्र मंगल योगाच्या निर्मितीमुळे विशेष लाभ होणार आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदीसाठी हा काळ चांगला असणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. मेडिकल, प्रॉपर्टीशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना यावेळी विशेष लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा काही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.
वृश्चिक रास (Vraschik Zodiac)
या राशीमध्ये, चढत्या घरात चंद्र मंगळ योग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांना प्रत्येक बाबतीत लाभ मिळू शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि आरोग्यही चांगले राहणार आहे. कायदेशीर बाबींमध्येही तुम्हाला यश मिळू शकणार आहे. मोठ्या प्रवासाची दाट शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या काळात चांगला नफा मिळेल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवण्यात यश मिळेल.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )