IND Vs SA Deepak Chahar Can Be Absent Form Team India In South Africa Tour Due To His Fathers Bad Health Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs SA, Deepak Chahar: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) हा टी-20 सीरिजसाठी (T-20 Series) टीम इंडियाचा (Team India) भाग असणार आहे. यानंतर दीपक चहरचा वनडे सीरिजसाठीही (ODI Series) संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, दौऱ्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर येत आहे. दीपक चहर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. वडिलांच्या प्रकृती अस्वास्थामुळे दीपक चहरनं टीमसोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. 

बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सीरिजमधील पाचव्या म्हणजेच, शेवटच्या सामन्यापूर्वी दीपक चहर अचानक घरी परतला होता, त्याबद्दल कर्णधार सूर्यकुमार यादवनं टॉसवेळी सांगितलं होतं की, दीपक मेडिकल एमरजन्सीमुळे घरी परतला आहे. आता दीपक चहरनं स्वतः सांगितलं की, त्याच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक आला आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दीपक आफ्रिका दौऱ्यावर जाणार की नाही? 

दीपक चहरनं ‘स्पोर्ट्स तक’शी बातचित करताना सांगितलं की, “माझ्यासाठी माझे वडील महत्त्वाचे आहेत. त्यांनी मला एक उत्तम खेळाडू बनवलं आहे, जो आज मी आहे. मी त्यांना अशा अवस्थेत सोडून जाऊ शकत नाही.” भारतीय क्रिकेट संघाच्या स्टार गोलंदाजानं स्पष्टच सांगितलं की, त्यानं दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत हेड कोच राहुल द्रविड आणि सिलेक्टर्ससोबत चर्चा केली आहे. 

दीपकनं पुढे बोलताना सांगितलं की, “आम्ही त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल केलं. नाहीतर परिस्थिती खरंच खूप गंभीर झाली असती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.” दीपकला आफ्रिका दौऱ्याबाबत विचारल्यावर त्यानं सांगितलं की, “ते माझ्या वडिलांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. सध्या मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही.”

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजनंतर आफ्रिका दौऱ्यासाठीही संधी 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात मुकेश कुमारच्या अनुपस्थितीत दीपक चहरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. चौथ्या सामन्यातही तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. आता त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघाचा भाग बनवण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

IND vs SA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचे धुरंधर रवाना; रोहित-विराटची अनुपस्थिती, कारण काय?

[ad_2]

Related posts