Adhir Ranjan Chowdhury On Amit Shah Minister Amit Shah And Congress Clash Over The Issue Of Jammu And Kashmir

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Adhir Ranjan Chowdhury On Amit Shah: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात  ( winter session of Parliament) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंबाबत (Pandit Jawaharlal Nehru) दिलेल्या वक्तव्यावरुन लोकसभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरबाबत माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांनी काही ‘चुका’ केल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार प्रहार केला. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आरोप केला की, केंद्र सरकारचे मंत्री आणि भाजपचे अनेक नेते काश्मीरचा प्रश्न आल्यावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर विनाकारण टीका करू लागतात.

अमित शाह यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याचा आरोप

जम्मू-काश्मीरच्या संदर्भात दिवसभर सभागृहात चर्चा झाली. यावर बोलताना काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ‘दूध का दूध और पानी का पानी’, असे म्हटलं. त्यावर अशा चर्चेला मी तयार असल्याचे अमित शाह म्हणाले. दरम्यान, अमित शाह यांनी  वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याचा आरोप अधीर रंजन यांनी केला. जम्मू काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, 2023′ आणि ‘जम्मू काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, 2023’ वरील चर्चेत भाग घेताना अमित शाहा यांनी पंडित नेहरूंबद्दल वक्तव्य केले होते. सभागृहात पाकव्याप्त काश्मीरचा (पीओके) उल्लेख करत गृहमंत्री यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांनी जम्मू-काश्मीरबाबत दोन ‘चुका’ केल्याचे म्हटले. शाह यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली. 

नेमकं काय म्हणाले अमित शहा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नेहरूंच्या काळात झालेल्या घोडचूकांमुळं काश्मीरला त्रास सहन करावा लागला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत झालेल्या दोन मोठ्या चुका त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे झाल्या, ज्याचे परिणाम काश्मीरला भोगावे लागले. सर्वात मोठी चूक म्हणजे जेव्हा आपले सैन्य जिंकत होते, तेव्हा पंजाब भागात पोहोचताच युद्धविराम लागू करण्यात आला आणि पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. जर युद्धविराम तीन दिवसांनी उशीर झाला असता, तर पाकव्याप्त काश्मीरचा भाग झाला असता. दुसरे म्हणजे हा मुद्दा यूएनमध्ये नेणं ही मोठी चूक झाल्याचे अमित शाह म्हणाले. 

‘दूध का दूध और पानी का पानी’

भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, जर पंडीत नेहरु देशासाठी हानिकारक आहेत आणि तुम्ही (सरकार) देशासाठी फायदेशीर आहात, मग या विषयावर दिवसभर चर्चा व्हायला हवी. दूध का दूध आणि पानी का पानी होईल असे अधिरंजन चौधरी म्हणाले. यावर शाह म्हणाले, “मी कधीही असे म्हटले नाही की नेहरु देशासाठी हानिकारक आहेत. सत्ताधारी पक्षातील एकाही सदस्याने असे सांगितले नाही. काश्मीर समस्येच्या मूळ मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे, असे मी म्हटले आहे. याच्या मुळाशी कोण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या:

Amit Shah : आजच्या निकालांनी सिद्ध केलं जातीच्या राजकारणाचे दिवस संपलेत, अमित शाह यांचं विरोधकांवर टीकास्त्र 

[ad_2]

Related posts