[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जेजुरी : अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri News) मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी बाहेरील व्यक्तीची नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरी ग्रामस्थांचं आंदोलन मागच्या 10 दिवसांपासून सुरु आहे. देवस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरी ग्रामस्थांनी पुनर्विचार याचिका धर्मादायुक्तांकडे दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. तसंच नवनियुक्त विश्वस्त मंडळाने जेजुरी पोलीस ठाणे येथील मार्तंड सभागृहात बैठक घेतली. या बैठकीत पोपट खोमणे यांची प्रमुख विश्वस्तपदी नेमणूक केली. त्यामुळं हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नवनियुक्त विश्वस्तांनी येऊन प्रमुख विश्वस्तांची नेमणूक केल्याने जेजुरीकर आक्रमक होण्याची शक्यता आहे.
जेजुरी धरणे आंदोलनाचा अकरावा दिवस आहे. काल जेजुरी ग्रामस्थांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळेस नवनियुक्त विश्वस्त मंडळांनी जेजुरी पोलीस ठाणे येथील मार्तंड सभागृहात बैठक घेतली. त्यावेळेस त्या बैठकीमध्ये पोपट खोमणे यांची प्रमुख विश्वस्त पदी नेमणूक केली नवनियुक्त विश्वस्तांनी येऊन प्रमुख विश्वस्तांची नेमणूक केल्याने जेजुरीकर आक्रमक होण्याची शक्यता आहे.
धर्मदाय आयुक्तांनी जेजुरीच्या सात विश्वस्तांची नेमणूक केली
अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीत सध्या यळकोट यळकोट जय मल्हारऐवजी निषेधाचा सूर उमटत आहे. या निषेधाचं कारण नवं विश्वस्त मंडळ आहे. स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना विश्वस्त मंडळात स्थान दिल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाची हाक देत नाराजी व्यक्त केली आहे. 19 मे रोजी धर्मदाय आयुक्तांनी जेजुरीच्या सात विश्वस्तांची नेमणूक केली. जेजुरी बाहेरील पाच लोकांची विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे जेजुरीकर आक्रमक झाले
विश्वस्त मंडळांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात
जेजुरी गडावरील भाविकांची वाढती संख्या बघता जेजुरी संस्थानाची घटना बदलून 7 ऐवजी 11 जणांची विश्वस्त मंडळाची रचना करावी अशी मागणी जेजुरीकरांनी धर्मदाय आयुक्तांकडे केली आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेराया हा बहुजनांचा देव म्हणून ओळखला जातो. खंडोबा चरणी नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून किंवा देशभरातून लाखो भाविक जेजुरीत दाखल होत असतात. परंतु याच जेजुरी संस्थांच्या विश्वस्त मंडळांची नियुक्ती ही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या विश्वस्तांच्या नियुक्तीला पक्षीय किनार असल्याचा देखील आरोप केला जातोय. त्यामुळे आता आक्रमक गावकऱ्यांपुढे प्रशासन नमते का हा खरा प्रश्न आहे.
हे ही वाचा :
Raj Thackeray: राज ठाकरे यांचा जेजुरीच्या आंदोलकांना पाठिंबा, उपमुख्यमंत्र्याशी बोलून मार्ग काढण्याची मागणी
[ad_2]