Income Tax Department Raided Corporate Office Of Boudh Distillery Private Limited Tax Evasion Allegations Recover Upto Rs 150 Crore Jharkhand Odisha Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Income Tax Raids: तुम्हाला अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) रेड (Raid) चित्रपट आठवतोय का? 1980 च्या दशकात एका धाडसी आणि प्रामाणिक आयकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आयकर विभागाच्या (Income Tax) अधिकार्‍यांनी केलेल्या खऱ्याखुऱ्या छापेमारीवर हा चित्रपट आधारित आहे. याच चित्रपटाची आठवण आज पुन्हा झाली ती म्हणजे, आयकर विभागानं ओदिशा (Odisha) आणि झारखंडमधील (Jharkhand) बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर केलेल्या छापेमारीमुळे. या छापेमारीत कंपनीशी संबंधित परिसरातून आयकर विभागानं नोटांचे मोठाले बंडल जप्त केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, या छापेमारीत आयकर विभागानं जप्त केलेली रोकड इतकी आहे की, मोजणी करता करता चक्क नोटा मोजण्याची मशिनच बंद पडली. 

आयकर विभागानं ओडिशातील बोलंगीर, संबलपूर आणि झारखंडमधील रांची, लोहरदगा येथील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तांवर कारवाई केली आहे. ही छापेमारी अजुनही सुरूच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत या छापेमारीत जप्त करण्यात आलेल्या रक्कमेपैकी तब्बल 50 कोटी रुपयांच्या नोटांची मोजणी पूर्ण झाली होती, मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर नोटा शिल्लक होत्या. नोटांची संख्या इतकी जास्त होती की, नोटा मोजण्यासाठी आणलेल्या मशीनही थकल्या आणि त्या बंद पडल्या. 

बुधवारी (6 डिसेंबर 2023) सकाळपर्यंत आयकर विभागाच्या पथकानं 50 कोटी रुपये जप्त करून त्यांची मोजणी केली. यावरुनच आयकर विभागाच्या छापेमारीत किती मोठी रोकड सापडली आहे याचा अंदाज तुम्हाला येऊच शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे, अद्याप छापेमारी संपलेली नाही. अजुनही छापेमारी सुरू असून आयकर विभागाचे लोक अजूनही बौद्ध डिस्टिलरीजच्या आवारात उपस्थित आहेत आणि कारवाई सुरू आहे. 

कुठे-कुठेआयकर विभागाची कारवाई? 

बौद्ध डिस्टिलरीज सोबतच झारखंडचे प्रसिद्ध उद्योगपती आणि व्यापारी रामचंद्र रुंगटा यांच्या घरावरही आयकर विभागानं छापे टाकले आहेत. प्राप्तिकर विभाग सकाळपासून रामगढ, रांची आणि इतर ठिकाणांसह रुंगटा यांच्या निवासस्थानावर आणि प्रतिष्ठानांवर छापेमारी करत आहेत. रामगड आणि रांची येथील रामचंद्र रुंगटा येथील अनेक ठिकाणी सर्वेक्षण सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. सीआरपीएफचे जवान येथे आयकर अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामगढ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी कारखाने आणि निवासस्थानांची चौकशी सुरू आहे. रामगढ शहरातील पंजाब नॅशनल बँकेजवळ असलेल्या रामचंद्र रुंगटा यांच्या निवासी कार्यालयात सकाळपासूनच अधिकारी एकत्र आले आणि कारवाई सुरू केली. अधिकारी पाच वाहनांतून घटनास्थळी दाखल झाले होते.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दादरमधील प्रसिद्ध भरतक्षेत्र साडी दुकानावर ईडीचे छापे, 12 तास चौकशी 15 लाख रुपयांची कॅश जप्त; 113 कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण 



[ad_2]

Related posts