Shiv Sena MLA Disqualification Case Live Update Shiv Sena UBT Counsel Adv Kamat Done Cross Examination Shinde Group MLA Dilip Lande Maharashtra Politic

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shiv Sena MLA Disqualification :  शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी (Shiv Sena Mla Disqualification case ) नागपूर विधीमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू झाली आहे. आजपासून शिवसेना ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलटतपासणी झाल्यानंतर आजपासून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी होईल. शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे : 

>> शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी : 

अॅड देवदत्त कामत : आपण एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तर हे प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिले केले आहे की आपल्या तर्फे केले आहे? 

दिलीप लांडे : माझी जी वस्तुस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

देवदत्त कामत : आपण पिटीशन क्रमांक 1 ते 16 मध्ये जी साक्ष दिली ती आपण एकनाथ शिंदे यांच्या वतीने देत आहात की स्वतः देत आहात

दिलीप लांडे : याचिका क्रमांक 1 ते 16 मध्ये माझे नाव नाही असे आपण मला सांगितले..पण जी सत्य परिस्थिती लोकांसमोर आणि न्यायालयासमोर यावी यासाठी ही साक्ष मी देत आहेत.. ही साक्ष मी एकनाथ शिंदे यांच्यावतीने नाही तर स्वतःच्या वतीने देत आहे. 

देवदत्त कामत : आपण याचिका क्रमांक 1 ते 16 मध्ये पक्षकार नाही आहात..आपण पक्षकार नसताना  तुम्ही साक्ष देत आहात म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने तुम्ही साक्ष देत आहात का? 

दिलीप लांडे : परिस्थिती अशी आहे की, याचिका क्रमांक 1 ते 16 मध्ये नाव आहे किंवा नाही हे आपण मला सांगितले..त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे हे आपल्या समोर आणि जनतेसमोर यावे म्हणून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. 

देवदत्त कामत : आपण एकनाथ शिंदेंच्या वतीने साक्ष देत नाहीत, आपल्याला याबाबत काय म्हणायचे आहे? हे खरे आहे की खोटे? 

दिलीप लांडे :  मी एकनाथ शिंदे यांच्या सपोर्टमध्ये साक्ष देत आहे. याचा अर्थ मी त्यांच्या वतीने देत आहे.

देवदत्त कामत : आपण शिवसेना या राजकीय पक्षाचे केव्हा पासून सदस्य आहात

दिलीप लांडे : मुंबईत आल्यापासून म्हणजेच 1984-85 पासून

देवदत्त कामत : आपल्या प्रतिज्ञापत्रातील परिच्छेद 11मध्ये तुम्ही म्हटले आहे की “तुम्ही  पक्षाच्या सदस्यत्व सोडून देईल अशी कुठलीही कृती केलेली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने चालत आहे. माझ्या पक्षाने निर्देश दिले त्यांच्या विरोधात काम केले नाही. पण तुम्ही पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत असाल तर 2005 मध्ये बाळासाहेब जिवंत असताना तुम्ही पक्ष का सोडला? 

दिलीप लांडे : मी आपल्यासमोर जी साक्ष दिली आहे, ती आताच्या वस्तुस्थितीवर दिली आहे. मी साक्षीमध्ये पूर्वीची वस्तुस्थिती मांडलेली नाही. त्यामुळे आता जी वस्तुस्थिती आहे, आता मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण आचरणात आणण्यासाठी त्या परिच्छेदात ते उत्तर दिले आहे.

देवदत्त कामत : बाळासाहेब ठाकरे हयात असताना तुम्ही शिवसेना राजकीय पक्ष सोडला होता अणि तुम्ही मनसे पक्षात प्रवेश केला. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? 

(शिंदे गटाच्या वकिलांचा आक्षेप या प्रश्नाला काहीही आधार नाही) 

दिलीप लांडे : मला यावर काहीही बोलायचे नाही.

देवदत्त कामत :  तुम्ही योग्य उत्तर देत नाही. 

शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक खडाजंगी

ठाकरे गटाच्या वकिलांचा आक्षेप साक्षीदार योग्य उत्तर देत नाही

शिंदे गटाकडून मात्र नकार. ते उत्तर देत असल्याचे वक्तव्य…

देवदत्त कामत : या आधीच्या प्रश्नात मी सुचवले ते खरे होते, म्हणून तुम्ही उत्तर टाळत आहात का? 

दिलीप लांडे : मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली आहे. माझे दैवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत, माझ्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे मी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

देवदत्त कामत : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध असलेल्या राजकीय पक्षांच्या विरुद्ध शिवसेनेने निवडणूक लढवल्या. बाळासाहेबांच्या शिकवणी विरोधात असलेल्या या पक्षांसोबत युती करणे मान्य आहे का? 

दिलीप लांडे : योग्य नाही. आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी या विचारांशी सुसंगत राहूनच आदरणीय ठाकरे कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवली. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस किंवा हिंदुत्त्वाच्या विरोधात ज्यांचे विचार आहेत अशा कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढविलेली नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिकवण आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी निवडणूक लढविलेली आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार आजपर्यंत आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

सुनावणी सुरू असून अपडेट्ससाठी पेज रिफ्रेश करावे….

 

 

[ad_2]

Related posts