[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IND vs AUS, WTC Final 2023 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) दुसऱ्या हंगामाचा अंतिम सामना 7 जूनपासून सुरु होणार आहे. अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने येतील. भारतीय संघ सलग दोन हंगामात अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला आहे. मागच्या हंगामातील निसटलं विजेतेपद विसरून टीम इंडिया यंदा चॅम्पियनशिप ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न करेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा थरार रंगणार आहे.
‘या’ तीन चुका टीम इंडियाला पडू शकतात महागात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या हंगामातही भारतानं अतिम फेरी गाठली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या मोसमातील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला मात देत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं होतं. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताच आठ विकेट्सने पराभव केला होता. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. न्यूझीलंडसमोर भारतीय फलंदाजांना फार कसरत करावी लागली होती.
टीम इंडियाला मागील पराभवातून धडा घेण्याची गरज
हा इतिहास पाहता भारताला पुन्हा हीच चूक करणं महागात पडणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना इंग्लंडच्या साउथँपटन मैदानावर खेळवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर टीम इंडियाला मागील पराभवातून धडा घेत या तीन चुका सुधाराव्या लागणार आहेत.
1 . संतुलन असणारी प्लेइंग 11 निवडावी लागेल
शेवटच्या WTC अंतिम सामन्यात म्हणजेच न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरला. टीम इंडियाचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. या सामन्यात रवींद्र जडेजाला फक्त एक विकेट घेता आली दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने परिस्थितीनुसार आपल्या संघात 4 वेगवान गोलंदाजांचा समावेश केला होता. ही चूक सुधारण्यासाठी कर्णधार रोहित शर्माला परिस्थितीनुसार संघाची निवड करावी लागणार आहे.
2. स्लिप फिल्डिंगमध्ये सुधारणा करण्याची गरज
कसोटी क्रिकेटमध्ये स्लिप फिल्डिंग खूप महत्त्वाचं आहे, इंग्लंडमधील खेळपट्टीव हे अधिक महत्त्वाचं आहे. बऱ्याच काळापासून स्लिप फिल्डिंग ही टीम इंडियासाठी एक मोठी समस्या असल्याचं समोर आलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या फायनलमध्ये अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी काही झेल सोडले, हे झेल सोडणं संघाला फार महागात पडलं.
3. वरच्या फळीतील एका फलंदाजावर मोठी जबाबदारी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाच्या सुरुवातीच्या फलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल. भारतीय संघातील टॉप-3 फलंदाज कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांना एक मोठी इनिंग खेळण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव 217 धावांवर तर दुसरा डाव 170 धावांवर आटोपला होता. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वरच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. टीम इंडियाला आता ही चूक सुधारावी लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
[ad_2]