Shiv Sena MLA Disqualification Hearing Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar On Shinde Group Mla Dilip Lande Cross Examination Maharashtra Politics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shiv Sena MLA Disqualification :  शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी (Shiv Sena MLA Disqualification) नागपूरमध्ये (Nagpur) सुरू आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना ही सुनावणी पार पडत आहे. आजपासून शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांची उलटतपासणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत (Adv. Devdutt Kamat) यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू असून आज आमदार दिलीप लांडे यांची पहिल्यांदा उलटतपासणी करण्यात आली. आमदार लांडे यांनी दिलेल्या एका उत्तरावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी मिश्किल टिप्पणी केली. तुमचे उत्तर भाषांतर करताना माझं डोकं भिरभिरतंय असे नार्वेकर यांनी म्हटले. 

मुंबईतील शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी अॅड. देवदत्त कामत यांनी घेण्यास सुरुवात केली. अॅड. कामत यांनी आमदार लांडे यांना काही प्रश्न विचारले. यावेळी अॅड. कामत यांनीआपल्या प्रतिज्ञापत्रातील परिच्छेद 11मध्ये तुम्ही म्हटले आहे की “तुम्ही  पक्षाच्या सदस्यत्व सोडून देईल अशी कुठलीही कृती केलेली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने चालत आहे. माझ्या पक्षाने निर्देश दिले त्यांच्या विरोधात काम केले नाही. पण तुम्ही पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत असाल तर 2005 मध्ये बाळासाहेब जिवंत असताना तुम्ही पक्ष का सोडला? त्यावर आमदार लांडे यांनी मी आपल्यासमोर जी साक्ष दिली आहे, ती आताच्या वस्तुस्थितीवर दिली आहे. मी साक्षीमध्ये पूर्वीची वस्तुस्थिती मांडलेली नाही. त्यामुळे आता जी वस्तुस्थिती आहे, आता मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण आचरणात आणण्यासाठी त्या परिच्छेदात ते उत्तर दिले आहे.

आमदार लांडे यांना पुढे पुन्हा एकदा, बाळासाहेब ठाकरे हयात असताना तुम्ही शिवसेना राजकीय पक्ष सोडला होता अणि तुम्ही मनसे पक्षात प्रवेश केला. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? असा प्रश्न केला. त्यावर मला यावर काहीही बोलायचे नाही, असे आमदार लांडे यांनी उत्तर दिले. त्यानंतर अॅड. कामत यांनी आमदार लांडे यांना काही प्रश्न केल्यानंतर पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध असलेल्या राजकीय पक्षांच्या विरुद्ध शिवसेनेने निवडणूक लढवल्या. बाळासाहेबांच्या शिकवणी विरोधात असलेल्या या पक्षांसोबत युती करणे मान्य आहे का? असा प्रश्न केला. त्यावर दिलीप लांडे यांनी योग्य नाही. आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी या विचारांशी सुसंगत राहूनच आदरणीय ठाकरे कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवली. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस किंवा हिंदुत्त्वाच्या विरोधात ज्यांचे विचार आहेत अशा कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढविलेली नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिकवण आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी निवडणूक लढविलेली आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार आजपर्यंत आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. असे उत्तर दिले. 

विधानसभा अध्यक्षांची मिश्किल टिप्पणी

अॅड. कामत यांनी आमदार दिलीप लांडे यांना गुगली प्रश्न टाकताना शिवसेना राजकीय पक्षाने सध्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणे हे योग्य आहे का?  असे विचारले. त्यावर आमदार लांडे यांनी आदरणीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अणि हिंदुस्थान देशामध्ये हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी…. असे उत्तर देत असताना विधानसभा अध्यक्षांनी त्यांना रोखले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लांडे यांना उद्देशून म्हटले की, आपण फक्त शिवसेनेने राष्ट्रवादी सोबत सत्तेत राहणे योग्य की अयोग्य हे सांगा. यावर लांडे यांनी मला माझे मत मांडू द्या असे म्हटले. त्यावर अध्यक्ष यांनी तुम्ही नीट मत मांडा, नाहीतर मला ते मराठीतून इंग्रजीत भाषांतर करताना भिरभिरतंय, अशी टिप्पणी केली. अध्यक्षांच्या या टिप्पणीने सभागृहात हसू उमटले. 

[ad_2]

Related posts