University will pay the entire tuition fees of transgender students chandrakant patil

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क विद्यापीठ भरणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठात राज्यस्तरीय विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ.निपुण विनायक, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवलाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, सहसंचालक प्रकाश बच्छाव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन करमळकर, प्राचार्य अनिल राव, राज्य विद्यापीठांचे कुलगुरू आदी सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क विद्यापीठांनी स्वत:च्या निधीतून भरावे आणि या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण मिळावे यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी बैठकीत केले.

या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कुलगुरूंनी हा निर्णय मान्य केला. त्यामुळे ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना आता विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये मोफत उच्च शिक्षण घेता येणार आहे.


हेही वाचा

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌्स‌ला डी. नोव्हो अभिमत विद्यापीठाचा दर्जा

[ad_2]

Related posts