Pravin Darekar BJP Leader Reaction On DCM Devendra Fadanvis Letter To Ajit Pawar Regarding Nawab Malik Maharashtra Politics Detail Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : नवाब मलिकांना (Nawab Malik) महायुती सरकारमध्ये समाविष्ट न करुन घेण्यासंदर्भात पत्र लिहिले. यावर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रतिक्रिया दिली.  हा कोणत्याही प्रकारच दवाब नसून ही भाजप (BJP) पक्षाची भूमिका असल्याचं प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलं. फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) पुढाकाराने हे सरकार सत्तेत आलं आहे, त्यामुळे त्यांची भूमिका हीच सरकारची भूमिका असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली. अजित पवारांचं (Ajit Pawar) निर्दोषत्व मिळालं, पण नवाब मलिकांचं तसं नाही. ते सध्या आरोग्याच्या कारणास्तव बाहेर आहेत. त्यांच्यावरचे आरोप खोटे आहेत, हे सिद्ध झालं की त्यांचं आम्ही सरकारमध्ये स्वागत करुच, असं प्रविण दरेकरांनी म्हटलं. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सध्या जामिनावर बाहेर आलेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी आपला मार्ग निवडला. परंतु नवाब मलिकांच्या बाबतीत सातत्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मलिक कोणत्या गटात जाणार हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला जात होता. मलिकांची त्यांची तटस्थपणाची भूमिका जाहीर केल्यानंतर मात्र या चर्चांना काहीसा पू्र्णविराम मिळाला. पण हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मलिकांच्या भूमिकेवर चर्चा सुरु झाल्या होत्या. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी  नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं. पण जोपर्यंत ते निर्दोष सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांना सरकारमध्ये सामील करुन न घेण्याची विनंती फडणवीसांनी अजित पवारांना केली. 

यामुळे सर्वांची तोंड बंद होणार – प्रवीण दरेकर

नवाब मलिक हे सकाळी सभागृहात सत्ताधारी गटाच्या बाजूने येऊन बसल्यानंतर फडणवीसांना अनेक प्रश्न विचारले जात होते. त्यामुळे फडणवीसांनी सभागृहात त्यांची भूमिका मांडली. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या वेळी काय झालं याचा पाढा वाचला. त्यामुळे भाजपने नेहमीच आचारविचारांशी तडजोड न करता देशाचा विचार केलाय. त्यामुळे फडणवीसांच्या या पत्राने सगळ्यांची तोंड बंद होणार असल्याचं असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं. 

फडणवीसांची भूमिका वयक्तिक नाही – प्रवीण दरेकर

फडणवीसांनी जी भूमिका मांडली ती वयक्तिक नाही. त्यामुळे त्यांची भूमिका हीच सरकारची आणि पक्षाची भूमिका आहे. भाजपच्या विचारधारेमुळे देशच सर्वोतोपरी अशी भावना त्यांची नक्कीच उफाळून येईल आणि या पत्राच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट होतेय. तुम्ही जर भाजपचा इतिहास पाहिला तर पक्षाने नेहमी सत्तेपेक्षा देशाला महत्त्व दिलं. पक्षाचा हाच इतिहास फडणवीसांच्या पत्रातून दिसत आहे. राज्यातल्या जनतेला जे आवडत नाही, तो मुद्दा त्यांनी निकाली काढलाय. 

हेही वाचा :

नवाब मलिक यांचं ठरलं, अजित पवार की शरद पवार गटात, सभागृहातील जागेवरुन अखेर भूमिका जाहीर!

[ad_2]

Related posts