Neelam Gorhe Criticized To Uddhav Thackeray Over MP Sanjay Raut Statement Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group Maharashtra Politics Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Neelam Gorhe on Sanjay Raut: पक्षश्रेष्ठींनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून हवं तसं बोलून घेत त्यांचा बळीचा बकरा केल्याचा आरोप विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला आहे. नागपुरात प्रेस क्लबनं आयोजित केलेल्या ‘मीट द प्रेस’मध्ये ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात (Shinde Group) सामील झालेल्या निलम गोऱ्हे बोलत होत्या. संजय राऊतांना आपण अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केल्याचंही नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. 

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आजारी पडल्यानंतर पक्षात काय सुरू आहे, हे कळत नव्हतं. आमदारांना निधीही दिला जात नव्हता. पक्षश्रेष्ठी यांना जे हवं होतं, ते संजय राऊतांकडून बोलून घेत होते. राऊत टोकाची भूमिका घेतात त्यावर मी आक्षेपही नोंदविला होता. त्यांना सल्लाही दिला होता. आक्रमक बोलण्यापेक्षा वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीनंही मांडता येतात. मात्र, त्यांनी ऐकलं नाही. या प्रकरणात त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं आहे, असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या (शिंदे गट) नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. 

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे बोलताना म्हणाल्या की, “महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आजारी पडले आणि त्यावेळी तब्बल दोन ते तीन आठवड्यांसाठी सर्वांचा संवाद थांबला. त्या मधल्या काळात पक्षात नेमकं काय सुरू आहे, नेमकं कोण काय करतंय? अशा बऱ्याच गोष्टी कळेनाशा झाल्या. आमदारांना निधी दिला जात नव्हता, यावरुन त्यांची नाराजी होतीच. तसेच, त्यांची दखल कोणीच घेत नाही, ही खंतही आमदारांच्या मनात होती. सगळंच विस्कळीत होतं. काय सुरूये काहीच कळत नाहीये.”

संजय राऊतांना पक्षानं बळीचा बकरा केलं, असं माझं मत : नीलम गोऱ्हे 

“मी संजय राऊतांशी स्वतः बोलले. त्यांना आता आठवतंय की, नाही मला माहीत नाही. मला त्यांच्याबाबत आदरच होता मनात, तेव्हाही होता आणि आजही आहे. मतभेद आहेत, वैचारिक मतभेद आहेत भरपूर, त्यांचे काही शब्द पटत नाहीत मला. पण मी त्यांना म्हटलं की, राऊत तुम्ही आत्ताच जेलमधून आला आहात. एवढी टोकाची भूमिका घेत आहात. त्याऐवजी जरा थोडसं शांतपणे बोला. 100 टक्के आक्रमक बोलण्यापेक्षा, वैचारिक मतभेद वेगळ्या पद्धतीनं मांडले जातात. तसं तुम्ही विचार करा याबाबत. यावर ते मला म्हणाले की, माझं आयुष्य मी समर्पित केलेलं आहे आणि मी असाच बोलणार. आता त्यांनीच असं बोलल्यावर पुढे काय बोलणार. शेवटी असं आहे की, आपण सांगण्याचं काम करू शकतो. त्यांचं बोलणं पक्षश्रेष्ठींना आवडणारं होतं, पटणारं होतं. पक्षश्रेष्ठींना स्वतः जे बोलायचं होतं, ते त्यांच्याकडून बोलून घेत होते. त्यामुळे त्यांना पक्षानं बळीचा बकरा केलं, असं माझं मत आहे.”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. 

[ad_2]

Related posts