Ambadas Danve Targets Devendra Fadnavis On Letter About Nawab Malik

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ambadas Danve : आमच्यासोबत असताना देशद्रोही, तुमच्यासोबत देशभक्त? दानवेंचा फडणवीसांना सवाल

नागपूर : राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नेते नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस ( Maharashtra Assembly Winter Session 2023) अक्षरशः रणकंदणाने गाजला. पहिल्या दिवशी विरोधक अन् सत्ताधारी एकमेकांवर अक्षरश: तुटून पडले. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून त्यांच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्याची सांगण्याची वेळ आली. 

आजच आमच्याकडे अंबादास दानवे यांचा प्रवेश झाल्याचे जाहीर करून टाका

आज (8 डिसेंबर) आजच्या दुसऱ्या दिवसांच्या सुद्धा नवाब मलिक यांच्यावरून तसेच मराठा आरक्षणावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आजच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी एक वेगळाच प्रसंग घडला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी आजच आमच्याकडे अंबादास दानवे यांचा प्रवेश झाल्याचे जाहीर करून टाका, अशी मिश्किली केली. 

[ad_2]

Related posts