[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Flipkart Big Year End Sale 2023: दिवाळी सेलनंतर आता ई-कॉमर्स वेबसाइट्सवर Year End Sale सुरू होईल. सेलअंतर्गत स्मार्टफोनसह इतर वस्तूंवर बंपर डिस्काउंट पाहायला मिळणार आहे. विशेषतः जुने झालेले असे स्मार्टफोनवर मोठ्या डील्स पाहायला मिळतील. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर (Flipkart )बिग Year End Sale ला सुरुवात झाली आहे. मात्र, हा सेल अद्याप सर्वसामान्यांसाठी लाईव्ह झालेला नाही. फ्लिपकार्ट प्लस मेंबरशिप असलेले लोक आजपासून सेलचा आनंद घेऊ शकतात. उद्यापासून हा सेल सर्वांसाठी लाईव्ह असेल जो 16 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
‘या’ स्मार्टफोन्सवर हजारो रुपयांची बचत
अॅपलच्या आयफोन 14 ची किंमत 57,999 रुपये आहे मात्र सेलमध्ये आपण तो 54,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. त्याचप्रमाणे आयफोन 14 प्लस 65,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या फोनची किंमत 29,999 रुपये असली तरी तुम्ही मोटोरोला एज 40 ची ऑर्डर 25,499 रुपयांना देऊ शकाल. एक्सचेंज ऑफरशिवाय हा फोन तुम्हाला 26,299 रुपयांमध्ये मिळणार आहे.
बजेट फोन घ्यायचा आहे का?
जे लोक बजेट फोन घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी रेडमी 12 4 G हा एक चांगला फोन आहे. हा फोन तुम्ही 9,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे POCO M6 प्रो 5जी 10,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट, 5,000 एमएएच बॅटरी आणि 6.79 इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले उपलब्ध आहे.
6,000 पेक्षा कमी बजेटचा फोन
जर बजेट 6,000 पेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठीही एक उत्तम ऑफर आहे. जर तुमचे बजेट 6,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला टिकाऊ अँड्रॉइड फोन घ्यायचा असेल तर पोको सी 51 हा एक चांगला पर्याय आहे. यात हेलियो जी ३६ प्रोसेसर, 5000 एमएएच बॅटरी,6.52 इंचाचा डिस्प्ले आणि 4/64 जीबी स्टोरेज आहे. सेलमध्ये पिक्सल 7A 37,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय Moto G54 5G 13,999 रुपये आणि VIVoT2 प्रो स्मार्टफोन 23,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
TV Offers : टीव्हीवरही ऑफर
सेलमधून तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे टीव्ही स्वस्तात खरेदी करू शकता. 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये तुम्हाला अनेक पर्याय मिळत आहेत. थॉमसन टीव्ही सेलमध्ये 5,999 रुपयात उपलब्ध आहे. कंपनी 43 इंच आणि 55 इंच स्क्रीन साइजमध्ये टीव्ही देखील ऑफर देत आहे. त्यामुळे तुमचा जर टीव्ही घ्यायचा विचार असेल आणि तुम्ही चांगल्या ऑफर्सची वाट बघत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठीच आहे असं समजा.
[ad_2]