[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Ram Temple Ayodhya Map : 22 जानेवारी 2024 ला अयोध्यामध्ये (Ayodhya ) प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मोठा सोहळा पार पडणार आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात अयोध्यामध्ये माणसांची गर्दी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. संपूर्ण जगभरात याची मोठी चर्चा सुरू आहे. भगवान श्री राम यांची अयोध्या नागरी खूप हायटेक असणार आहे.भगवान श्री राम यांचे दर्शन घेणाऱ्या श्रद्धाळूंना अनेक प्रकारच्या ऑनलाइन सुविधा मिळणार आहेत. या सगळ्या सुविधा एका ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येतील. या अॅपमध्ये अयोध्यामध्ये जाणाऱ्या सगळ्या लोकांना सुविधा मिळू शकेल. अयोध्या विकास प्राधिकरण यांच्यामार्फत हे ॲप लवकरच लॉंच केला जाईल. या ॲपच्या लॉंचिगची पूर्ण तयारी झाली असली तरी देखील या ॲपची लॉंच डेट अजूनही जारी केली नाही आहे. मात्र हे ॲप नेमका कसा काम करतो आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत हेच आता आपण जाणून घेऊया..
कोणत्या मिळतील सुविधा ?
CNBC च्या रिपोर्टनुसार, सरकारच्या मार्फत अयोध्यामध्ये जाणाऱ्या लोकांना रस्ते किंवा गल्ली समजण्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये याच्यासाठी अयोध्या नगरीचे 3D मॅपिंग केलं जाणार आहे.यामुळे निविगेशनच्या बाबतीत दर्शन करणाऱ्या लोकांना खूप मदत होईल.अयोध्याच्या मॅपिंगसाठी जेनेसिस मॅपिंग इंटरफेस याचा वापर केला जाईल. हे ॲप डाऊनलोड करून दर्शन घेणाऱ्या लोकांना अयोध्या बघण्याची संधी मिळेल. या ॲपच्या मदतीने लोकांना अनेक अडचणींपासून समाधान मिळू शकते. गर्दीमुळे होणारी धांदल किंवा सगळा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी हा ॲप एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची असेल सुविधा
अयोध्याच्या मॅपिंगमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी खास सुविधा सुद्धा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सोबतच हे इनोव्हेटिव्ह 3D मॅपिंग सिस्टीम आणि नेवीगेशन यांना ऑफर करेल. यामुळे शहरातील कोणत्या पण गोष्टीला ट्रॅक करणे आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी मदत मिळेल.
3D मॅपिंग सोबत मिळतील ‘या’ सुविधा
अयोध्या शहराच्या अधिकारीक नेविगेशन टूलच्या रूपात जेनेसिसच्या डिजिटल मॅपिंग प्लॅटफॉर्मची निवड करण्यात आली आहे. येणाऱ्या दिवसात अयोध्येमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त असेल अशी आशा वर्तवली जात आहे. याच कारणामुळे सरकारने टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने शहराचे इन्फ्रास्टेक्चर खूप मजबूत बनवण्याच्या तयारीत काम सुरू केले आहे. यामध्ये शहराच्या 3D मॅपिंगचे काम खूप महत्त्वाचे ठरत आहे.
इतर महत्वाची बातमी-
रामलल्लाचा भव्य प्रतिष्ठापना सोहळा; घराघरांत आमंत्रण, अक्षता वाटप, राज्यातील 1 कोटींपेक्षा अधिक रामभक्तांचा जल्लोष
[ad_2]