Udayanraje Bhosale Reaction On Maratha Reservation Said Government Should Increased Reservation Limit Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : जास्त दिवस घोंगड भिजत ठेवलं तर ते वास मारतच आणि जास्त दिवस एखद्याकडे दुर्लक्ष केलं तर चीड येणारच असं म्हणत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सरकारला घरचा आहेर दिला. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पटलावर आहे. त्यातच आता त्या आरक्षणाची मागणी मुंबईत केली जाणार असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे पायी दिंडीने मुंबईच्या दिशेने कूच करतील. पण त्याआधी उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. 

यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांना देखील टोला लगावला. त्यावेळेस जर मंडल आयोगाच्या बाबतीत  सगळं केलं असतं तर आज हा विषयच राहिल नसता, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर टीका केली.  इतर राज्यांप्रमाणे राज्यातील आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी देखील यावेळी उदयनराजेंनी केलीये. राज्यातील आरक्षण मर्यादा वाढवली तर सहज प्रश्न सुटेल. आरक्षण मर्यादा 70 ते 72 टक्के करा, हाच पर्याय असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं. इतर राज्यांनी जसे राज्य पातळीवर जसे निर्णय घेतले तसे महाराष्ट्र शासन निर्णय घेतला तर सहज आरक्षण विषय सुटेल, लोक आज ग्रासले आहेत, असं उदयनराजेंनी म्हटलं

मराठा आरक्षणाचा मुद्दा

मागील अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने सुरुवात केलीये. त्यातच आता मनोज जरांगे यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईकडे कूच करणार असल्याची घोषणा केलीये. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन हे मुंबईत सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवे अशी मागणी मराठा समाजाकडून केली जातेय. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेऊ देणार नाही, अशी भूमिका राज्यातील ओबीसी नेत्यांनी घेतलीये. त्यामुळे राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा समाज असा संघर्ष पाहायला मिळतोय. 

न्यायालयाचे निर्णयानुसार राहल नार्वेकरांनी निकाल दिला – उदयनराजे भोसले

न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे नार्वेकर यांनी निकाल दिला. लोकांची मान्यता असली पाहिजे, लोकांचा आदर केला पाहिजे. परिस्थिती बदलत असते. अशी का परिस्थिती झाली याचा विचार त्या पक्षाने केला पाहिजे, असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. राहुल नार्वेकरांनी दिलेल्या आमदार अपात्रतेच्या निर्णयावर उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

हेही वाचा : 

पुन्हा बघतो! मराठेही बरच काम हातात घेतील; मनोज जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा

[ad_2]

Related posts