WTC Final 2023 IND vs AUS Live Streaming When and Where to Watch India vs Australia Matches Timetable; WTC Final जिओ सिनेमावर नाही तर या ॲपवर LIVE पाहता येणार, जाणून घ्या सामन्याची योग्य वेळ

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ २०२३ च्या सर्वात मोठ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final 2023) च्या विजेतेपदाच्या सामन्यात रोहित सेना ऑस्ट्रेलियाशी (IND vs AUS) भिडणार आहे. भारतीय संघ गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाचा सामना इंग्लंडमध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांसमोर परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान असेल. दोन्ही संघ आपापले पहिले विजेतेपद मिळविण्यासाठी जोमाने तयारी करत आहेत. पण हा सामना नेमका किती वाजता खेळवला जाणार, त्याचसोबत या सामन्याचे थेट प्रक्षेपण मोबाईल तसेच टीव्हीवर कुठे पाहता येणार; जाणून घेऊया.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ ते ११ जून या कालावधीत लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता तर भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता खेळवला जाणार आहे. तर दुपारी २:३० या सामन्याची नाणेफेक होईल. या सामन्यासाठी भारतीय संघ लंडनला पोहोचला असून आता ते ओव्हल मैदानावर सराव करत आहेत .

लाईव्ह स्ट्रीमिंग

संपूर्ण आयपीएल २०२३ चे लाईव्ह प्रक्षेपण आपण जीव सिनेमावर पाहिले होते. पण या सामन्यांचे लाईव्ह आपल्याला जीव सिनेमावर पाहता येणार नाही. तर या सामन्याचे लाईव्ह आपल्याला पुन्हा एकदा डिजनी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. तर याचसोबत स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या टीव्ही चॅनेलवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लाईव्ह पाहता येणार आहे.

आरसीबीसारखे संघ एका विजयासाठी गुडघे टेकतात तिथे १० फायनल आणि ५ ट्रॉफी जिंकतो त्याला धोनी म्हणतात !

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत
ऑस्ट्रेलिया संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , जयदेव उनाडकट.

[ad_2]

Related posts