Maharashtra Weather Update Today Rain Prediction In Kokan Vidarbh Cold And Cloudy Climate In Other Parts Of State Maharashtra Weather Forecast Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Weather Update Today : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरुळक पावसाची (Rain Updates) शक्यता आहे. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Update) देशासह राज्याच्या हवामानावर परिणाम झाला आहे. भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा प्रभाव राज्याच्या हवामानावरही दिसून येत आहे. राज्यात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. इतर ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.

कोकण, विदर्भात पावसाची शक्यता

मुंबई, पुण्यासह राज्यात पुढील 5-6 दिवसांत कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री थंड वाढेल. आज राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून 13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहणार असून कोकण, विदर्भात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. 

पुढील 24 तासांत पावसाचा अंदाज

पुढील 24 तासांत, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कर्नाटक किनारीपट्ट भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात मध्यम ते दाट धुके पडण्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये तापमानाचा पारा घसरणार आहे.

 

 

[ad_2]

Related posts