Parbhani Shivsena MP Shrikant Shinde Speech In Parbhani Maharashtra Govt News Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shrikant Shinde : आत्ताची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath shinde) हे सर्वसामान्यांना न्याय देणारे आहेत. महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे आता खान पण आहे आणि बाण पण आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असे वक्तव्य शइवसेनेचे नेते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी केलं. सरकार करत असलेल्या कामांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवा असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी परभणीच्या (Parbhani) पाथरीत झालेल्या सभेत केलं. 

परभणीच्या पाथरीतील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर शिवसेनेच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या वतीने भव्य रोजगार मेळावा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या सभेसाठी श्रीकांत शिंदे त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते व सचिव नरेश मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांचे पाथरीमध्ये स्वागत मोठ्या भव्य दिव्य पद्धतीने करण्यात आले. अनेक जेसीबी लावून फुलांची उधळण तसेच दोन ठिकाणी क्रेन लावून क्विंटल क्विंटल चे हार घालत त्यांचं स्वागत करण्यात आलं. पाथरीत आल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यालयाचे लोकार्पण केलं यानंतर त्यांनी नोकरी महोत्सवाचे उद्घाटन करत अनेक तरुण-तरुणींना जागेवरच जॉब कार्डच वाटपही केलं. लगेच झालेल्या जाहीर सभेत श्रीकांत शिंदे यांनी आत्ताची शिवसेना आणि मुख्यमंत्री हे सर्व समावेशक असून प्रत्येक घटकासाठी काम करणारे आहेत. त्यामुळं आमच्याकडे सर्व समाजातील नेतृत्व असल्याचा सांगत खान आणि बाणही आमच्याकडे असल्याचे सांगितले.

मराठा तरुणांनी दाखवले काळे झेंडे

जातीभेद न करता सर्वांनी पक्षाचे काम करून सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असलेलं काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केलं. या कार्यक्रमादरम्यान काही मराठा तरुणांनी हातात काळे झेंडे घेत घोषणाबाजी केली. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी या तरुणांना स्टेजवर बोलावून त्यांचं म्हणणं ऐकून घेत समजावून सांगितलं. यावेळी या तरुणांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास असल्याचं सांगितले. महत्त्वाचं म्हणजे श्रीकांत शिंदे आजारी असतानाही ते या कार्यक्रमासाठी हजर झाले होते. त्यांनी या कार्यक्रमात येण्याचं महत्त्व जाहीर भाषणातून सांगितलं.

 सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काम सुरु

संबंध मराठा समाजाचा विश्वास हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. त्यांनी शिवरायांची शपथ घेऊन सांगितलेले आहे की मराठा आरक्षण देणार असे श्रीकांत शिंदे म्हणाले. क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केलेली आहे. त्याचा पाठपुरावा केलेला आहे कुणबी दाखलेही देणे सुरू असल्याचे शिंदे म्हणाले. सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे काम करत असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

खासदार श्रीकांत शिंदेंना भर सभेत मराठा युवकांनी दाखवले काळे झेंडे, विरोधात जोरदार घोषणाबाजी 

 

[ad_2]

Related posts