11 December In History Dinvishesh Satara Koyana Earthquake Actor Dilip Kumar Birthday Today In History Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : कोयना येथे 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन 180 जण ठार आणि 1500 लोक जखमी झाले आणि मोठया प्रमाणात वित्तहानी झाली होती. बुद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद याचा जन्म 11 डिसेंबर  1969 रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांचाही जन्म 1922 मध्ये 11 डिसेंबर रोजी झाला होता. आचार्य रजनीश ‘ओशो’ यांचा जन्मदिवस  आहे. 11 डिसेंबर 1931 रोजी त्यांचा जन्म झाला. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचाही जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी बंगालमध्ये (आता पश्चिम बंगाल) झाला. याबरोबरच साहित्याचे नोबेल पारितोषिक जिंकणारे इजिप्शियन कादंबरीकार नजीब महफूज यांचाही जन्म 11 डिसेंबर रोजी झाला.  

1845 : पहिल्या  अँग्लो-शीख युद्धाची सुरूवात 

पहिले अँग्लो-शीख युद्ध पंजाबचे शीख राज्य आणि ब्रिटिश यांच्यात 1845-46 मध्ये लढले गेले. या युद्धानंतर शीख राज्याचा काही भाग ब्रिटिश राजवटीचा भाग बनला. पहिल्या शीख युद्धाची पहिली लढाई  18 डिसेंबर 1845 रोजी मुडकी येथे झाली. 

1922 :  अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म 

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि राज्यसभेचे माजी सदस्य दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला.  भारतीय चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार हे एक उत्तम लोकप्रिय अभिनेते होते.  जन्मतः त्यांचे नाव मोहम्मद युसूफ खान होते. परंतु, हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून दिलीप कुमार ठेवले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत 5 दशकांची प्रदीर्घ कारकीर्द गाजवली. 7 जुलै 2021 रोजी त्यांचे निधन झाले. 

1935 : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचाही जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी बंगालमध्ये (आता पश्चिम बंगाल) झाला. ते भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. मुखर्जी यांनी 2012 ते जुलै 2017 या कालावधीत राष्ट्रपतीपद भूषवले होते.

 1941 : जर्मनी आणि इटलीने अमेरिकेविरुद्ध युद्ध घोषित केले 

जर्मनी आणि इटलीने 11 डिसेंबर 1941 रोजी अमेरिकेविरुद्ध युद्ध घोषित केले. इटलीचा शासक बेनिटो मुसोलिनी याने प्रथम युद्धाची घोषणा केली. त्यानंतर  जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याने युद्धाची घोषणा केली.

1946 : राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली

9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक संविधान सभागृहात झाली. याला आताचा संसद भवन सेंट्रल हॉल म्हटले जाते. संविधान सभेला संबोधित करणारे पहिली व्यक्ती जे. बी. कृपलानी होते. तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली होती.  त्यानंतर  11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून हरेंद्र कुमार मुखर्जी आणि घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून बी.एन. राव यांची निवड करण्यात आली. 

1967 : कोयना भूकंप 

कोयना येथे 11 डिसेंबर 1967 रोजी 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात जवळपास  180 जण ठार झाले होते. तर  तब्बल दीड हजा लोक जखमी झाले होते. या अपघातात  मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. या भूकंपामुळे कोयना नगर टाऊनशिपमध्ये 80% पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले. परंतु काही तडे वगळता धरणाचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही ज्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यात आली. 1967  पासून तेथे लहान तीव्रतेचे अनेक भूकंप झाले आहेत. भूकंपामुळे जमिनीत 10-15 सेमी  फूट पडली जी 25 किलोमीटर  लांबीवर पसरली. काही भूगर्भशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की भूकंप जलाशयामुळे निर्माण झालेल्या भूकंपाच्या हालचालींमुळे झाला होता.

इतर महत्त्वाच्या घटना

1911 : इजिप्शियन कादंबरीकार नजीब महफूज यांचा जन्म 
1931 : अध्यात्मिक गुरू रजनीश यांचा जन्म 
1936 :  ब्रिटनचा राजा एडवर्ड आठवा याने स्वेच्छेने राजे पदाचा त्याग केला 
1946 : युनिसेफची स्थापना 
1969 : बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याचा जन्म
2006 : अंतराळवीर सुनिता विल्यम आय. एस. एस. (आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन) वर पोहोचली.

[ad_2]

Related posts