Oneplus 12 5g And Oneplus 12r 5g Launch Date Confirm Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

OnePlus Smartphone Launch Date : तुम्ही जर वनप्लस (OnePlus) स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. OnePlus 12 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन सर्वात आधी चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आता स्मार्टफोन निर्माता कंपनी जागतिक बाजारपेठेत हा फोन लॉन्च करणार आहे. कंपनीने लॉन्चिंगच्या संदर्भात तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, 23 जानेवारी 2024 रोजी  OnePlus 12 5G आणि  OnePlus 12 R 5G हे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहेत. 

भारतातही हा स्मार्टफोन याच दिवशी लॉन्च होईल अशी आशा आहे. याआधी स्मार्टफोनचा फ्लॅगशिप 2024 च्या सुरुवातीला लॉन्च होईल असे कंपनीकडून सांगण्यात आला होते. या स्मार्टफोनची आणखी काय वैशिष्ट्ये आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

भारतात कधी होणार लॉन्च ?

टिप्स्टर Max Jambor ने काही दिवसांपूर्वीच या स्मार्टफोनची लॉन्च डेट शेअर करण्यात आली होती. हा स्मार्टफोन भारतातून लॉन्च होईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. याचाच अर्थ भारतातही वनप्लस स्मार्टफोन 23 जानेवारी रोजी लॉन्च होईल असा अंदाज आहे. 

OnePlus 12 5G हा स्मार्टफोन सर्वात आधी चीनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे त्याचे स्पेसिफिकेशन्सची माहिती आहे. मात्र,  OnePlus 12 R 5G मध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील या संदर्भात अद्याप  माहिती समोर आलेली नाही. कंपनी मागच्या वेळेस सारखीच R सीरिजमध्ये एक वर्ष जुना प्रोसेसर देईल अशी आशा व्यक्त केली जातेय. याचाच अर्थ OnePlus 12 R मध्ये आपल्याला Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळू शकतो. 

OnePlus 12 5G मध्ये काय आहे खास?

या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा Amoled डिस्प्ले मिळू शकतो.  जो 120 Hz रिफ्रेश रेटसह सपोर्ट करण्यात येईल. स्क्रिनच्या प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass Victus 2 देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा ऑप्शन देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर बेस्ड Color OS 14 काम करतो. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा मेन लेंन्स 50MP ची आहे. याच्या व्यतिरिक्त 48MP अल्ट्रा वाईड एंगल लेन्स आणि 64 MP चा टेलीफोटो लेन्स देण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :

Nothing Phone 2a : नथिंग कंपनीचा बजेट फ्रेंडली फोन, भन्नाट फिचर्स लीक; लवकरच होणार लाँच

[ad_2]

Related posts