( प्रगत भारत । pragatbharat.com)
Vish Yog In Kumbh: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनी हा सर्वात मंद गतीचा ग्रह मानला जातो. तर दुसरीकडे आणि चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. शनी अडीच वर्षांत राशी बदलतो, तर चंद्राला अडीच दिवस लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार 17 डिसेंबर रोजी दुपारी 3:44 वाजता चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मुख्य म्हणजे शनी आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत शनि आणि चंद्राच्या संयोगामुळे विष नावाचा अशुभ योग तयार होत आहे.
विष योगाच्या निर्मितीमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार असून या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल. ज्योतिष शास्त्रानुसार, या योगाच्या निर्मितीचा व्यक्तीच्या मनावर जास्त प्रभाव पडतो. यामुळे तणाव, अस्वस्थता, चिंता यांसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे.
कर्क रास (Kark Zodiac)
या राशीमध्ये शनि आठव्या भावात स्थित आहे आणि चंद्र घराचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना कौटुंबिक किंवा कार्यालयामुळे तणावाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहावे लागेल. जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
मिथुन रास (Mithun Zodiac)
या राशीमध्ये शनी नवव्या भावात स्थित आहे. त्यामुळे तुम्ही जास्त खर्चाने त्रस्त होऊ शकता. कठोर परिश्रम करूनही यश मिळणार नाही. नात्यातही काही तणाव निर्माण होईल. वैवाहिक जीवनात पती-पत्नीला थोडा राग येऊ शकतो. व्यवसायात कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. तणावाचा सामना करावा लागू शकतो.
सिंह रास (Leo Zodiac)
विष योगाचा या राशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कामाबद्दल थोडे असमाधानी होऊ शकता. तणावामुळे काही मुद्द्यांवर सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक नुकसान होण्याचीही दाट शक्यता आहे.लव्ह लाईफमध्येही काही अडचणी येण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या कामावर विशेष लक्ष द्यावे लागेल.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )