India South Africa 2nd T20 Match Port Elizabeth Weather Report Here Know Latest Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs SA 2nd T20 Weather Forecast : भारत आणिल दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. आता दुसऱ्या टी 20 सामन्यावरही पावसाचे सावट आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका होत आहे. यामधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. आता दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. मंगळवारी भारत आणि आफ्रिका यांच्यात सेंट जॉर्ज पार्क मैदानात आमने सामने असती. पण पावसामुळे चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारी एलिजाबेथ परिसरात धुवांधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी पोर्ट एलिजाबेथमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मंगळवारी पोर्ट एलिजाबेथमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहिल्या टी 20 सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही पाऊस व्हिलन होण्याची शक्यता आहे. मंगळवारी येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संध्याकाळी पाच वाजता 20 पावसाचा अंदाज आहे. तर  तापमान 24 डिग्री सेल्सियस ते 17 डिग्री सेल्सियस यादरम्यान राहू शकते. ढगाळ वातावरण राहू शकते, असेही हवामान विभागाने सांगितेलय. 

वेगवान गोलंदाजांना मदज करणारी खेळपट्टी –

सेंट जार्ज पार्क मैदानात आतापर्यंत फक्त तीन टी 20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. दोन सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवलाय. तर एका सामन्यात धावांचा पाठलाग करत विजय मिळवण्यात आलाय. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 179 इतकी आहे. या मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी आहे. वेगवान गोलंदाज प्रभावी ठरु शकतात. 

भारतात कधी पाहायला मिळणार सामना ?

भारत आणि आफ्रिका यांच्यामध्ये ‘सेंट जॉर्ज पॉर्क’ मैदानावर सामना होणार आहे. आफ्रिकेत हा सामना सायंकाळी पाच वाजता सुरु होणार आहे, भारतामध्ये 8.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात – 

 दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला तीन सामन्यांची T20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळाणार आहे.   सूर्यकुमार यादव याच्याकडे टी 20 संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर वनडेमध्ये केएल राहुल कर्णधार असेल आणि कसोटी मालिकेत रोहित शर्मा धुरा संभाळणार आहे.  दुसरा T20 सामना 12 डिसेंबरला आणि तिसरा T20 सामना 14 डिसेंबरला होणार आहे. 

दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी20 स्क्वॉड  
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर. 

[ad_2]

Related posts