Sanjay Raut Shiv Sena UBT Police Filed Fir Against Sanjay Raut For Writing Article Against PM Modi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sanjay Raut :  शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shiv Sena UBT) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना रोखठोक भाष्य भोवण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal) उमरखेड पोलीस ठाण्यात (Umarkhed Police Station) देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना वृत्तपत्रातील रविवारच्या आवृत्तीतील ‘रोखठोक’ सदरात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावती प्रचारानंतर भारतीय जनता पार्टीला तीन राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळाले. या विजयाचे विश्लेषण संबंधी लेख सामना दैनिकाचे संपादक तसेच खासदार संजय राऊत यांनी ‘दैनिक सामना’ या वृत्तपत्रात 10 डिसेंम्बर 2023ला ‘रोखठोक’ सदरात  प्रसिद्ध केले. या लेखात पंतप्रधान पदावर असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरुद्ध आक्षेपार्ह व प्रक्षोभक असे विधान केले असल्याचा आरोप भाजपने केला.

संजय राऊत यांनी काय म्हटले होते?

मध्यप्रदेश, राजस्थान मध्ये काँग्रेसचा विजय झाला असता तर 2024 च्या निवडणुकी आधी मोदीनी पाकिस्तानशी संगनमत करुन एखादा बाँम्ब टाकला असता, एखादे पुलवामा घडतांना उघड्या डोळ्यांनी पाहले असते, अशी टीका केली.काश्मिरातील हिंसाचारात पाकिस्तानचा हात आहे, देश खतरेमे है च्या गर्जना करुन देशभक्तीसाठी भाजपने मत मागितले असते. जवानाच्या शवपेट्यांना वंदन करणारी छायाचित्रे घेवून फिरवून आपण आपल्यासारखे आपणच, दुसरे कोणीही नाही. हे ठासविण्याचा प्रयत्न केला असता, अशी टीका संजय राऊत यांनी रोखठोक सदरात केली होती. 

यवतमाळमध्ये भाजप आक्रमक 

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे यांचे वर बिनबुडाचे गंभीर असे दिशाभूल करणारे आरोप जगाच्या पातळीवर देशाची प्रतिमा मलीन करणारे असल्याचा आरोप भाजपने केला.  या कारणावरून भादंवि कलम 153 (अ), 505 (2), 124 (अ) अन्वये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याकची मागणी भाजपचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी  केली होती. त्यावरून आज उमरखेड पोलीस ठाण्यात संपादक तथा खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

संजय राऊत यांनी कायम देशविरोधी लिखाण केले असल्याचा आरोप भुतडा यांनी केला. राऊत यांच्या लेखामुळे दोन धर्मात तेढ निर्माण होऊन देशात अशांतता माजेल असा आरोप भाजपने केला. त्यामुळे राऊत यांच्या आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आल्याचे नितीन भुतडा यांनी सांगितले. 

[ad_2]

Related posts