[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जगातील सर्व महासागरांमध्ये केवळ रहस्यमयी प्राणीच नाहीत तर कित्येक टन सोने देखील लपलेलं आहे. अमेरिकन सरकारी विभाग नॅशनल ओशन सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, समुद्राच्या तळामध्ये २० दशलक्ष टनपेक्षा जास्त सोने पडून आहे. त्याची किंमत सुमारे ८०० ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असेल. हे सोनं इतकं आहे की त्यातून अमेरिकेसारखे अनेक बलाढ्य देश तयार होतील.
कोणत्या जहाजात अपघातावेळीही सोनं होतं?
१६४१ मध्ये ब्रिटनचे रॉयल मर्चंट नावाचे जहाज खराब हवामानामुळे कॉर्नवॉलजवळ पाण्यात बुडाले. या जहाजाचा वरचा भाग २०१९ मध्ये सापडला होता. परंतु त्याचा उर्वरित भाग आजवर सापडलेला नाही. हे जहाज बुडाले तेव्हा त्याच्या तिजोरीत एक लाख पौंड सोनं होतं, असा अंदाज आहे.
पोर्तुगीज कार्गो फ्लोअर दे ला मेरने गुलाम देशांमधून सोने आणि मौल्यवान वस्तू गोळा करून पोर्तुगालला नेण्याचे काम जवळजवळ एक दशकापर्यंत केले. १६व्या शतकाच्या सुरुवातीला पॅसिफिक महासागरात अपघात होऊन एक जहाज समुद्रात बुडाले होते. असा अंदाज आहे की त्यावेळी या जहाजात २ अब्ज डॉलर्स किमतीचे सोने ठेवण्यात आले होते. अशी एक दोन नाही तर हजारो जहाजं समुद्राच्या तळाशी असतील.
या बुडालेल्या सोन्याची किंमत किती असेल?
नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशननुसार, समुद्रात किती सोने किंवा मौल्यवान वस्तू आहेत हे सांगणे कठीण आहे. बहुतेकदा ते मोठ्या बुडलेल्या जहाजांच्या आधारे मोजले जाते. पण, असं मानलं जातं की हे सोनं इतकं जास्त असेल की त्याच्या किंमतीत अनेक नवे आणि शक्तिशाली देश तयार होऊ शकतात. जहाजातील हे सोनं सहसा लुटलेले असायचे जे गुलाम देशांकडून जिंकल्यानंतर आपल्या देशात नेले जात असत.
आता प्रश्न हा आहे की जर इतकं सोनं समुद्रात आहे आणि ते आपल्याला माहिती आहे. तर हे सोनं समुद्रातून बाहेर का काढलं जात नाही.
आजवर हा खजिना काढता का आला नाही?
पहिली गोष्ट म्हणजे समुद्राच्या कोणत्या भागात किती सोने आहे हे आपल्याला माहिती नाही. जरी याची माहिती आपण लावली तरी इतक्या खोल समुद्रात जाऊन ते सोनं काढणं काही सोपी गोष्ट नाही. खोलात पोहोचलो तरी अनेक समस्या येऊ शकतात. कारण, समुद्राच्या खोलात सोनं जमिनीवर पडलेले असेल असं तर नाही. ते एखाद्या मोठ्या दगडाखाली गाडलं गेलं असेल किंवा त्यावर कोरल रीफ तयार झाली असेल. अशा स्थितीत ते काढण्यासाठी खोदकाम करावे लागेल. या संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागेल याचा काही नेम नाही. हे काम मशीन्सला देखील दिलं जाऊ शकतं, पण अचानक वादळ आलं किंवा मासे मशीन्स खराब करु शकतात.
सोने शोधण्याचे साधन
अनेकवेळा समुद्रात सोने कुठे आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. समुद्रावर काम करणाऱ्या देशी-विदेशी संस्था यासाठी सातत्याने काम करत आहेत. सर्वप्रथम, १९व्या शतकाच्या उत्तरार्धात, ब्रिटीश चर्चचे धर्मगुरू आणि गणितज्ञ फोर्ड जार्नेगन यांनी यासाठी एक साधन बनवले. गोल्ड अॅक्युम्युलेटर नावाच्या या उपकरणाबाबत त्यांनी दावा केला की, पारा आणि विजेच्या मदतीने आपण समुद्रात दडलेले सोने शोधून काढू शकतो.
जार्नेगनने एक कंपनी देखील स्थापन केली, ज्याचे नाव होते – इलेक्ट्रोलाइड मरीन सॉल्ट्स. कंपनीने आपली जाहिरात खूप जोरात सुरू केली. अनेक गुंतवणूकदारांनीही आपले पैसे गुंतवले. समुद्रात सोन्याचा कथित शोध आणि खोदकाम चालूच होते. नंतर जर्नेगन गुंतवणूकदारांनी दिलेल्या पैशांसह कुठेतरी गायब झाला. सोने सापडले नाही.
समुद्रात सोने सुरक्षित आहे का?
समुद्राच्या खाऱ्या पाण्यात जवळजवळ सर्व काही वितळून जातं. जर एखादे जहाज शेकडो वर्षांपासून त्याच्या तळाशी असेल, तर खाऱ्या पाण्यामुळे सोनं केवळ वितळणारचं नाही तर तो पाण्यात विरघळूही शकते.
[ad_2]