Weather Update Today Rain Alert In Tamil Nadu Chennai Likely To Drizzle In Maharashtra Snowfall In Jammu Himachal

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Update Today : देशात बहुतेक राज्यांमध्ये तापमानात घट (Temperature Drops) झाल्याचं दिसून येत आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाचा (Cyclone) प्रभाव कमी झाला असला तरी, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आजही पावसाची शक्यता आहे. देशात 13 ते 16 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज (Rain Updates) वर्तवण्यात आला आहे. ईशान्य भारत (Northeast India) आणि दक्षिण भारतात (South India) पावसाची शक्यता (Rain Prediction) आहे. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) सुरु आहे. तामिळनाडू (Tamil Nadu), आसामसह (Assam) काही भागात आज पाऊस पडण्याचा अंदाज (Rain Alert) हवामान विभागाने वर्तवला आहे.

पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत केरळ आणि माहेमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, दिल्लीच्या तापमानात आणखी घट होईल आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात आणखी घट होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे.

कुठे धुके तर, कुठे पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज, 13 डिसेंबर 2023 ला अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये पावसाची शक्यता आहे. यासोबतच आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 13 आणि 14 डिसेंबरला दाट धुके पडण्याची शक्यता आहे. या राज्यांव्यतिरिक्त पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्येही धुके पडण्याची शक्यता आहे. आयएमडी (IMD) च्या अंदाजानुसार 16 डिसेंबरला दक्षिणेकडील तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

देशाच्या तापमानात मोठ्या प्रमाणात घट

गेल्या चार दिवसांपासून देशाच्या तापमानात मोठी घट झाली आहे. काश्मीर आणि हिमालच प्रदेशासह हिमालयीन भागात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. दक्षिण भारतात आज पावसाची शक्यता असली तरी, महाराष्ट्रात आज हवामान कोरडं राहणार आहे, तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तामिळनाडू, कराईकल, केरळ, पुद्दुचेरी लक्षद्वीप भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. चेन्नईमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

 



[ad_2]

Related posts