Health Insurance News How Much Health Insurance Coverage Is Enough How To Choose Best Know Tips Explains

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Health insurance : अलीकडच्या काळात आरोग्याच्या (Health) बाबतीत लोक जागरुक होतना दिसत आहे. कोरोना संकटानंतर (Corona Crisis) लोकांमध्ये आरोग्य विमा घेण्याचा ट्रेंडही वाढला आहे. अशा परिस्थितीत, कधी कधी किती आणि कोणत्या प्रकारचा आरोग्य विमा (Health insurance) घ्यावा? हे निवडणे खूप कठीण असते? कोणता आरोग्य विमा तुमच्या सर्व समस्या सोडवेल आणि तुमची प्रत्येक गरज पूर्ण करेल? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात…

आरोग्य ही केवळ तुमचीच नाही तर सरकारचीही सर्वात मोठी चिंता आहे. त्यामुळे केंद्रापासून ते राज्य सरकारांनी आपापल्या स्तरावर वेगवेगळ्या आरोग्य विमा योजना आणल्या आहेत. पण गरीब वर्गासाठी हे अधिक योग्य आहेत, अशा परिस्थितीत तुमच्या गरजा पूर्ण करणारा आरोग्य विमा कसा निवडावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

किती आणि कोणत्या प्रकारचा आरोग्य विमा योग्य?

प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे आरोग्य विम्याची निवड अत्यंत विचारपूर्वक करावी लागेल. जर तुम्ही तरुण असाल तर तुम्हाला कोणताही जुनाट आजार नाही. मग तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या आरोग्य कव्हरेजची आवश्यकता असेल आणि तुमचा प्रीमियम देखील कमी असेल. म्हणून, आरोग्य विमा निवडताना हे 3 घटक लक्षात ठेवणे सर्वात महत्वाचे आहे.

सर्वप्रथम तुम्ही कुठे राहता? यासह, तुम्हाला जवळच्या वैद्यकीय सुविधांवर होणाऱ्या खर्चाचा अंदाज लावणे सोपे होईल.

तुमचे वय, म्हणजे विमा उतरवलेल्या व्यक्तीचे वय काय आहे आणि त्याची आरोग्य स्थिती काय आहे. तुमच्या कुटुंबाचा आरोग्य इतिहास काय आहे? तुम्ही तरुण असाल तर तुमचा प्रीमियम कमी असेल.

भविष्यातील महागाईचा औषधे आणि इतर हॉस्पिटलायझेशन खर्चांवर होणार्‍या प्रभावाचा अंदाज. हे पण बघावे लागेल.

30 वर्षांचे लोक हा आरोग्य विमा घेऊ शकतात

जर तुमचे वय 30 वर्ष असेल तर मग तुम्ही कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना घेऊ शकता. हे कुटुंबाला सर्वोत्तम कव्हरेज प्रदान करतात. बहुतेक आरोग्य विमा पॉलिसींमध्ये पत्नी आणि मुले जोडण्याचा मानक पर्याय असतो. काही प्रकरणांमध्ये, पालक किंवा सासरच्या लोकांना देखील जोडण्याचा पर्याय आहे. तर ‘वैयक्तिक आरोग्य विमा’ पॉलिसी अविवाहित लोकांसाठी अधिक चांगली आहे. हे सर्वसमावेशक कव्हरेज प्रदान करतात.

कोणत्या वयात कोणती योजना चांगली?

जर तुम्ही आरोग्य विमा घेणार असाल तर कोणत्या वयासाठी कोणती योजना चांगली असेल या संदर्भात, तज्ञांचा असा विश्वास आहे की 18-30 वयोगटातील लोक मूलभूत आरोग्य विमा योजना घेऊ शकतात. ज्यामुळं त्यांच्या आपत्कालीन गरजा पूर्ण होतील. 31 ते 50 वयोगटातील लोकांनी सर्वसमावेशक आरोग्य विम्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. 51 किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनी त्यांच्या गरजेनुसार आरोग्य विमा घ्यावा. साधारणपणे 5 ते 10 लाख रुपयांचे कव्हरेज असलेला आरोग्य विमा घ्यावा. 

महत्त्वाच्या बातम्या:

प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेचा लाभ कसा मिळवायचा? सविस्तर माहिती एका क्लिकवर

 

[ad_2]

Related posts