M K Stalin Tweet Pn Cisf Officerbehavior With Tamil Woman At Goa Airport On Hindi Language Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : हिंदी येत नसल्याने गोव्यातील दाबोळी विमानतळवर सीआयएसएफ (CISF) कर्मचाऱ्याने तामिळनाडूच्या महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला. हिंदी राष्ट्रीय भाषा (Hindi Language) असून गुगल करुन तपासून पाहा असे कर्मचारी म्हणाला असा आरोप महिलेने केला. महिलेने याप्रकरणी विमानतळ प्रशासनाकडे तक्रार केली. यावरुन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Tamil Nadu CM M.K.Stalin) यांनी चिंता व्यक्त केली आहे.

 

काय म्हणाले एम के स्टॅलिन? 

बिगर हिंदी भाषिक राज्यातील प्रवाशांचा हिंदी येत नसल्यामुळे CISF कर्मचार्‍यांकडून छळ होत असल्याच्या आणि हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा असल्याचा चुकीचा समज स्वीकारण्यास भाग पाडण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत. शर्मिला यांनी निदर्शनास आणल्याप्रमाणे, ही केवळ एका व्यक्तीशी संबंधित समस्या नसून, असंवेदनशीलता दर्शवते. प्रवाशांशी कसे वागावे आणि आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेबद्दल कर्मचार्‍यांना शिक्षण देण्यासाठी सीआयएसएफने त्वरित पावले उचलणे अत्यावश्यक आहे. भारतात भेदभावाला स्थान नाही. सर्व भाषांचा समान आदर करूया, असे ट्विट तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केले आहे.

हिंदी भाषा लादणे बंद करा असा हॅशटॅग वापरुन स्टॅलिन यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हे ट्विट टॅग केले आहे.

ही बातमी वाचा:



[ad_2]

Related posts