Second Hand Car Buying Tips Digital Police Citizen Services Check Car History Free

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Second Hand Car Buying Tips: जर तुम्ही सेकंड हँड कार (Car) घेण्याचा विचार करत असाल तर सावधान, अन्यथा भविष्यात तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कार खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी तपासल्या पाहिजे, तुम्ही या गोष्टी तपासल्या नाहीत तर तुम्ही कायदेशीर बाबीत अडकू शकता.

सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी कायदेशीर गोष्टी तपासणं देखील अत्यंत आवश्यक आहे. काही वेळा काही गाड्यांचे रेकॉर्ड खराब असतात, जसं काही गाड्यांवर खटले प्रलंबित असतात, ज्यामध्ये पुढे तुम्ही फसू शकता. त्यामुळे कोणतीही सेकंड हँड कार घेण्यापूर्वी तिचा इतिहास तपासणं गरजेचं आहे.

आता एखाद्या गाडीचा इतिहास कसा तपासायचा? हे येथे जाणून घेऊया, यासाठी तुम्हाला काहीही मोठं करण्याची गरज नाही. तुम्हाला कारचा संपूर्ण इतिहास बसल्या ठिकाणीच मिळेल.

डिजिटल पोलीस नागरिक सेवा (Digital Police Citizen Services)

  • डिजिटल पोलीस सिटिझन सर्व्हिसेस पेजवर तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल. तुम्हाला फक्त Google वर Digital Police Citizen Services लिहून सर्च करायचं आहे.
  • पेजवर गेल्यानंतर तुम्हाला वाहन नोंदणी क्रमांकाच्या पर्यायावर क्लिक करावं लागेल.
  • यानंतर, वाहन नोंदणी क्रमांक टाकून शोधा. येथे तुम्हाला वाहनाचा संपूर्ण तपशील दर्शवला जाईल, ज्यामध्ये गाडीचा इतिहास (Vehicle History) देखील समाविष्ट आहे.

सेकंड हँड कार खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • सेकंड हँड कार खरेदी करताना, सर्वात पहिली लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, वाहनाची किंमत. गाडीची स्थिती, मॉडेल, किलोमीटर काऊंट आणि इतर घटकांवर गाडीची किंमत अवलंबून असते.
  • वाहनाची स्थिती तपासा, गाडीत एखादं काम तर निघणार नाही ना? हे समजून घ्या. अन्यथा गाडी रिपेअर करण्यासाठी तुम्हाला खूप खर्च येईल.
  • वाहनाचं मॉडेल तपासा, तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते मॉडेल तुमच्या बजेटमध्ये आहे की नाही ते तपासा.
  • वाहनाचा किलोमीटर काऊंटर तपासा, वाहन जास्त चालवलं गेलं आहे का? हे पाहा.
  • कारचं इंजिन आणि टायर योग्य स्थितीत आहेत की नाही ते तपासा. याशिवाय कारच्या एसी आणि ब्रेककडेही लक्ष द्या.
  • तुम्ही कार खरेदी करायला गेलात तर एखाद्या अनुभवी व्यक्तीला सोबत घ्या आणि शक्यतो त्या गाडीची चाचणी घ्या. बर्‍याचदा तुम्ही कारची टेस्ट ड्राईव्ह घेता तेव्हाच तुम्हाला त्यातील कमतरता कळतात.
  • कारवर एखादं जुनं कायदेशीर प्रकरण चालू असेल तर ती कार घेणं टाळा, अन्यथा ती कारवाई भविष्यात तुमच्यावर होऊ शकते.

हेही वाचा:

Diesel Bike: पेट्रोल नव्हे, तर डिझेलवर चालायची Royal Enfield ची ‘ही’ बाईक; मायलेज 80kmpl

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

[ad_2]

Related posts