[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आडिशातील या अपघातानंतर अनेक जण मदतीसाठी पुढे आले आहेत. यात विरेंद्र सेहवाग देखील मागे नाही. अपघातात ज्या मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावले आहे त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवागने घेतली आहे. या सर्व मुलांना तो मोफत शिक्षण देणार आहे. या घटनेचा फोटो शेअर करत सेहवागने एक पोस्ट लिहली आहे.
पोस्टमध्ये सेहवाग म्हणतो, हा फोटो बराच काळ आपल्याला वेदना देईल. या दुख:च्या प्रसंगी मी कमीत कमी इतक तरी करू शकतो की ज्या मुलांनी त्यांचे आई-वडील गमावले आहेत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलू शकतो. मी अशा सर्व मुलांना सेहवाग स्कूलच्या बोर्डिंगमध्ये मोफत शिक्षणाची जबाबदारी घेत आहे. या सर्व कुटुंबियांसाठी प्रार्थना आणि ज्या लोकांनी बचाव कार्यात पुढाकार घेतला त्यांचे मनापासून आभार. वैद्यकीय पथक आणि रक्तदान करणाऱ्यांचे देखील आभार. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
सेहवागच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे कौतुक केले. २०१५ साली सेहवागने भारताकडून अखेरची मॅच खेळली होती. सोशल मीडियावर सक्रीय असलेला सेहवाग नेहमी त्याच्या पोस्टमुळे चर्चेत असतो.
एखाद्या संकटाच्या काळी मदत करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी सेहवागने २०१९ साली पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. करोना काळात देखील त्याने गरजूंना मोफत भोजन दिले होते. ४४ वर्षीय सेहवागने हरियाणा येथे एक शाळा सुरू केली असून तेथे अनेक मुलांच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय केली आहे.
[ad_2]