मोठी बातमी! सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला येणार; आजच घेणार भेट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी बैठक बोलावली असताना, आता सरकार देखील ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासात सरकारचा एक शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) हे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. सरकारची भूमिका या शिष्टमंडळाच्या मार्फत मनात जरांगे यांच्याकडे मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सोबतच उद्याच्या आंतरवाली सराटीमधील बैठकीत कोणताही कठोर असा निर्णय घेऊ नयेत, अशी विनंती देखील शिष्टमंडळाकडून केली जाणार  असल्याचं बोलले जात आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारने म्हणून जरांगे यांच्याकडे 24 डिसेंबर पर्यंत मुदत मागितली होती. मात्र, ही मुदत संपण्यासाठी अवघ्या आठ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. असे असताना सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं म्हणत जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या आंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार असल्याचं जरांगे म्हणाले आहे. तर, उद्याच्या बैठकीपूर्वी सरकारचा एक शिष्टमंडळ आज जरांगे यांच्या भेटीला येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात हे शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार आहे. गिरीश महाजन आणि संदिपान भुमरे यांचे या शिष्टमंडळात सहभाग असणार असल्याची माहिती मिळत आहे.

यापूर्वी शिष्टमंडळाने फिरवली होती पाठ…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतले होते. मात्र, याचवेळी जरांगे यांना टाईम बॉन्ड देण्याचे ठरले होते. या अनुषंगाने सुरुवातीला दोन ते तीन वेळेस सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट देखील घेतली. मात्र, त्यानंतर अनेकदा शिष्टमंडळाने वेळ देऊनही भेट घेतली नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा चौथा टप्पा देखील पूर्ण झाला, मात्र तरीही शिष्टमंडळ काही भेटीला आलं नव्हतं. मात्र, आता जरांगे यांनी पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक बोलवण्याचा इशारा देताच सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या भेटीत आता नेमकी काय चर्चा होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

बैठकीकडे सर्वांचे लक्ष…

मराठा आरक्षणाच्या लढाईची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी उद्या महत्वाची बैठक आंतरवाली सराटीमध्ये बोलावली आहे. त्यापूर्वी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात होणाऱ्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचे असणार आहे. तर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : ‘एडपट, माझ्या नादी लागू नको’; मनोज जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल

[ad_2]

Related posts