Apple WWDC 2023 Live Updates Apple Event Mixed Reality Headset Ios 17 I Watch Os 10 New Iphone Features Ipad

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Apple WWDC 2023: ॲपल (Apple) या नामांकित कंपनीची वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद (WWDC 2023) सुरू झाली आहे. 5 जून ते 9 जून या कालावधीमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. अ‍ॅपल आपल्या नवीन लॉन्चेस आणि नवीन फिचर्स विषयी महत्त्वाच्या घोषणा करत आहे. ॲपल कंपनीचा हा वर्षातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. याची उत्सुकता जगभरातील लोकांना आणि अ‍ॅपल युजर्रसला लागून राहिलेली असते. त्यामुळे यंदाच्या ॲपलच्या या परिषेदत होणाऱ्या महत्त्वाच्या घोषणांकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. 

नवीन मॅकबुक एअरची पाहिली झलक

अ‍ॅपलने (Apple) बहुप्रतीक्षित नवीन मॅकबुक एअरची (Macbook Air) पहिली झलक समोर आणली आहे. हे मॅकबुक 15 इंच आहे. त्याची बॅटरी 18 तासांपर्यंत चालेल. त्याच्या परफॉर्मन्समध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. कंपनीचा दावा आहे की, डिस्प्ले आधीपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक उजळ (Bright) आहे आणि बॅटरीचे लाइफ 50 टक्के जास्त आहे, तसेच मॅकबुक आधीच्या व्हर्जनपेक्षा 40 टक्क्यांनी पातळ (Slim) आहे. नवीन MacBook ची किंमत $1,299 पासून सुरू होईल, म्हणजेच सुमारे 1.07 लाख रुपये इतकी किंमत असेल. नवीन मॅकबुक (MacBook) 3 प्रकारात येणार आहे.

नवीन मॅकबुक या वैशिष्ट्यांसह आहे सुसज्ज

11.5 मिमी जाड
3.3 पाउंड
15.3 इंच डिस्प्ले
500 nits ब्राइटनेस
1080P कॅमेरा
6 स्पीकर्स
M2 प्रोसेसर

iOS 17 ची झाली घोषणा

अ‍ॅपलने (Apple) आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 17 लाँच केली आहे. कंपनीने यात अनेक फिचर्स जोडले आहेत. यूजर्सना त्यांच्या फोटोंचे कस्टम स्टिकर्स बनवण्याची सुविधा देण्यात आली आहे. कीवर्डवर मोठ्या सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे अ‍ॅपलच्या (Apple) उपकरणांवर टायपिंग करणे अधिक सोपे झाले आहे.

यासोबतच ॲपलने ॲप स्टोरवर नवीन गेम्स लॉन्च (App Store New Games Launch) केले आहेत. यासह आयवॉचमध्ये देखील नवीन अपडेट्स (New I watch Updates) आणले आहेत.

कुठे पाहाल ॲपलची ही परिषद?

ॲपलच्या या परिषदेला सोमवारी (5 जून) रात्री साडेदहा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. तर 9 जून रोजी या कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. हा कार्यक्रम तुम्ही ॲपल टीव्ही, ॲपल यूट्यूब आणि ॲपल इव्हेंट पेजवर पाहू शकता. या कार्यक्रमाचा महत्त्वाचा दिवस हा 6 जून असणार आहे. ज्याचे प्रसारण 6 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 1.30 वाजता होईल. ॲपलचा हा भव्यदिव्य कार्यक्रम तुम्ही देखील लाईव्ह पाहू शकता.

हेही वाचा:

महागड्या इलेक्ट्रिक कारसाठी देशातील पायाभूत सुविधांची स्थिती कशी? ई-ट्रॉन खरेदीचा निर्णय कितपत योग्य? पाहा…

[ad_2]

Related posts