PANJ PYARE Takhat Sachkhand Shri Hazur Sahebji Nanded Three New Decisions For Sikh Marriage Maharashtra News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nanded : नांदेडचे तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथील पंचप्यारे साहिबानी (Panj Pyare Takhat Sachkhand Shri Hazur Sahebji) शिख धर्मातील लग्नाबाबत तीन निर्णय घेण्यात आले आहेत. लग्नात नवरी मुलीने परिपूर्ण पंजाबी सूट आणि सलवार परिधान करावे , लग्न पत्रिकेत सिंग आणि कौर नावाचा उल्लेख करावा , नवरीला लग्न मंडपात आणताना छत्र वापरू नये असे निर्णय घेण्यात आले आहेत. शीख धर्मात पंचप्यारे यांनी घेतलेल्या निर्णयाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व असून त्यांच्या या निर्णयाचे शीख धर्मातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

काय आहेत तीन निर्णय?

नांदेडच्या तख्त सचखंड श्री हुजुर साहिब अबचल नगर येथील पंचप्यारे साहिबाननी शिख धर्मातील लग्नाबाबत तीन निर्णय घेतले आहेत. लग्न पत्रिकेवर नवरदेवाच्या नावामागे सिंह आणि नवरीच्या नावामाघे कौर असा उल्लेख केला जात नसल्याचे दिसून येतय. शिख धर्मात सिंह आणि कौर हे खिताब श्री गुरुगोविंद सिंहजी महारांजानी दिले. यासाठी त्यांना बलिदान द्यावे लागले. लग्न पत्रिकेवर सिंह आणि कौर नावाचा उल्लेख असावा असं या नव्या नियमात सांगितलं आहे.

 लग्नात मुलीच्या डोक्यावर छत्र नको

लग्नात लावा फेरेच्या वेळेस नवरी महागडे कपडे परिधान करतात, तसं न करता लावा फेरेच्या वेळेस नवरी मुलीने गुरु मर्यादेनुसार परिपूर्ण पंजाबी सूट आणि सलवार परिधान करावे असं सांगितलं आहे. तसेच लग्न मंडपात नवरीला आणताना तिच्या डोक्यावर ओढणी किंवा फुलाची सजावट असलेले छत्र वापरले जात आहे. त्यामुळे गुरुग्रंथ साहिब यांचा अदब, सत्कार राहत नाही. त्यामुळे लग्न मंडपात मुलीला आणताना  छत्र देखील वापरू नये असे तीन निर्णय पंचप्यारे साहीबानी घेतले आहेत.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts