BMC शाळांमध्ये भगवान श्रीरामावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बीएमसीच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी श्री राम या थीमवर आधारीत कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही मागणी केली आहे. मंगल प्रभात लोढा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) पत्र लिहून शिक्षण विभागाला या थीमवर स्पर्धांची मालिका आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुढील वर्षी 22 जानेवारीला अयोध्या राम मंदिराच्या स्थापनेपूर्वी ही स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश आहेत. 1 ते 15 जानेवारी 2024 दरम्यान ‘प्रभू श्री राम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. या निर्देशाला विरोधकांकडून टीका होत आहे.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना १५ डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात लोढा यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये १ ते १५ जानेवारी दरम्यान ‘प्रभू श्री राम’ या विषयावर निबंध लेखन, कविता लेखन आणि चित्रकला आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

रविवारी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्र लिहून शिक्षणाचे भगवेकरण तसेच पालकमंत्र्यांचा प्रशासकीय कामकाजात बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी केली आहे.


हेही वाचा

लोकसभा घुसखोरी प्रकरणात महाराष्ट्रातील तरूणाचाही समावेश


संसदेतील घुसखोरी प्रकरणानंतर विधानसभेच्या सुरक्षेत वाढ

[ad_2]

Related posts