Parliament 31 Lok Sabha MPs Suspended Today On Security Breach Winter Session Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MPs suspended from Lok Sabha : संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 31 खासदारांना निलंबित करण्यात आलंआहे. त्यामध्ये लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) आणि इतर प्रमुख खासदारांचा समावेश आहे. आजही  विरोधी पक्ष संसदेच्या सुरक्षेबाबतच्या आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर या सर्व 31 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या काळापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. या आधी दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या 13 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. 

 

लोकसभेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत दोन्ही सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. 

खासदार निलंबित आणि संसदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित

गेल्या आठवड्यात संसदेची सुरक्षा भेदून काही तरूण लोकसभेत घुसले होते. त्यानंतर त्याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेत या मुद्द्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली. 

संसदेत झालेल्या या गोंधळानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधी पक्षांच्या 31 खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. संसदेच्या कामकाजात अडथळे आणल्याप्रकरणी अध्यक्षांनी गोंधळ घालणाऱ्या 31 खासदारांना निलंबित केलं. त्यामध्ये काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, टीआर बालू आणि दया निधी मारन यांचा समावेश आहे. त्यानंतर संसदेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. 

आज कोणत्या खासदारांना निलंबित करण्यात आले?

अधीर रंजन चौधरी, के जय कुमार, अपूर्व पोद्दार, प्रसून बॅनर्जी, मोहम्मद वसीर, जी सेल्वम, सीएन अन्नादुराई, डॉ टी सुमाथी, के नवस्कानी, के वीरस्वामी, एनके प्रेमचंद्रन, सौगता रॉय, शताब्दी रॉय, असित कुमार मल, कौशलेंद्र कुमार यांच्याशिवाय , अँटोनी अँटोनी, एसएस पलानामनिकम, अब्दुल खालिद, तिरुवरुस्कर, विजय बसंत, प्रतिमा मंडल, काकोली घोष, के मुरलीधरन, सुनील कुमार मंडल, एस राम लिंगम, के सुरेश, अमर सिंह, राजमोहन उन्नीथन, गौरव गोगोई आणि टीआर बालू.

या आधी 13 खासदार निलंबित 

याआधीही लोकसभेतील 13 विरोधी खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यात काँग्रेसचे टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोसे, व्हीके श्रीकंदन, बेनी बेहानन, मोहम्मद जावेद आणि मनीकोम टागोर यांचा समावेश आहे. द्रमुकच्या कनिमोळी, सीपीआय(एम)चे एस वेक्शन आणि सीपीआयचे के. हे सुब्बारायन आहे.

तर टीएमसी सदस्य डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

ही बातमी वाचा :



[ad_2]

Related posts